मकर संक्रांतीच्या(Makar Sankranti 2026) उत्साहानंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे 'किंक्रांत(Kinkrant 2026). पंचांगानुसार, संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो: पहिला दिवस 'भोगी', दुसरा दिवस 'संक्रांत' आणि तिसरा दिवस 'किंक्रांत' (यालाच 'कर' किंवा 'करदिन' असेही म्हणतात).
मकर संक्रांती २०२६: सुगड पूजनाशिवाय संक्रांत अपूर्ण! वाचा साहित्य, शास्त्रोक्त विधी आणि शुभ मुहूर्त
किंक्रांत म्हणजे काय? पौराणिक कथा: किंकर असुराचा वध
पौराणिक कथेनुसार, 'देवी संक्रांतीने' संक्रांतीच्या दिवशी 'संक्रासुर' नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, संक्रांतीने 'किंकर' नावाच्या अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षसाचा वध केला. याच विजयाचा दिवस म्हणून याला 'किंक्रांत' म्हटले जाते.
देवीने या राक्षसाचा संहार करून पृथ्वीवरील सज्जनांचे रक्षण केले, म्हणून या दिवशी देवीच्या 'विजयी रूपाची' पूजा केली जाते.
किंक्रांत हा दिवस 'अशुभ' का मानला जातो?
समाजमनात अशी समजूत आहे की किंक्रांत हा दिवस शुभ कामासाठी वर्ज्य आहे. यामागे काही कारणे आहेत: १. युद्धाचा दिवस: हा दिवस युद्धाचा आणि संहाराचा होता, म्हणून नवीन मंगल कार्याची सुरुवात या दिवशी टाळली जाते. २. सावधानतेचा काळ: संक्रांतीचा काळ हा संक्रमणाचा असतो. या काळात निसर्गात बदल होत असतात, त्यामुळे जुन्या काळातील लोक या दिवशी लांबचा प्रवास किंवा महत्त्वाची कामे करणे टाळत असत. ३. विश्रांतीचा दिवस: भोगी आणि संक्रांतीच्या गडबडीनंतरचा हा दिवस गृहिणी आणि इतरांसाठी विश्रांतीचा मानला जातो.
किंक्रांतीला काय करावे?
देवीची उपासना: हा दिवस राक्षसावरील विजयाचा असल्याने देवीची मनोभावे पूजा करावी.
हळद-कुंकू: अनेक ठिकाणी मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत सुवासिनी हळद-कुंकवाचा कार्यक्रम करतात. त्याला किंक्रांतही अपवाद नसते.
दानधर्म: थंडीचा काळ असल्याने गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा उबदार कपड्यांचे दान करणे शुभ मानले जाते.
त्यामुळे हा दिवस शुभ कार्यारंभासाठी वगळता पूजा अर्चा, दान धर्म करण्याच्या दृष्टीने हा दिवस शुभच ठरतो!
Web Summary : Kinkrant, the day after Makar Sankranti, commemorates the slaying of the Kinkar demon. While considered inauspicious for new beginnings due to its association with war and transition, it's a day for worshipping the goddess, offering charity, and resting after Sankranti festivities.
Web Summary : मकर संक्रांति के बाद किंक्रांत का दिन किंकर राक्षस के वध का प्रतीक है। युद्ध और संक्रमण से संबंध के कारण इसे नई शुरुआत के लिए अशुभ माना जाता है, लेकिन यह देवी की पूजा, दान करने और संक्रांति उत्सव के बाद आराम करने का दिन है।