शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री २०२६: ७२ तासांचा महासंयोग! महाशिवरात्रीला जोडून आले 'हे' दोन मोठे शुभ योग बदलतील तुमचे नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:08 IST

महाशिवरात्री २०२६: यंदा महाशिवरात्रीला १४, १५ ,१६ फेब्रुवारीला सलग ३ मोठे योग जुळून येत आहेत; त्यानिमित्ताने केलेले 'हे' उपाय बदलतील तुमचे नशीब!

फेब्रुवारी २०२६ मधील हा काळ शिवभक्तांसाठी अत्यंत दुर्मिळ आणि 'महासंयोग' घेऊन आला आहे. १४ फेब्रुवारीला शनिप्रदोष(Shani Pradosh 2026), १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री(Mahashivratri 2026) आणि १६ फेब्रुवारीला सोमवती अमावास्या(Somvati Amavasya 2026) असा त्रिवेणी संगम एकापाठोपाठ येत आहे. हा काळ पितृदोष, शनिदोष आणि ग्रहपीडा दूर करण्यासाठी सुवर्णसंधी आहे.

महाशिवरात्री २०२६: नशिबाची साथ कोणाला मिळणार? महादेवाच्या कृपेसाठी राशीनुसार करा 'हे' दान

शनिप्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावास्येचा 'महासंयोग'; शिवकृपेसाठी करा हे विशेष उपाय!

यंदा फेब्रुवारी महिन्यात शिवभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. एकापाठोपाठ येणारे तीन अत्यंत शुभ योग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो.

१. शनिवार, १४ फेब्रुवारी: शनिप्रदोष (पितृदोष आणि शनिदोष निवारण)

जेव्हा त्रयोदशी शनिवारी येते, तेव्हा त्याला 'शनिप्रदोष' म्हणतात. ज्यांच्या पत्रिकेत साडेसाती किंवा शनिदोष आहे, त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.

विशेष उपाय: संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवाला काळे तीळ अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी लाभते.

२. रविवार, १५ फेब्रुवारी: महाशिवरात्री (महाकल्याणकारी योग)

हा शिव आणि शक्तीच्या मीलनाचा महान उत्सव आहे. या दिवशी केलेली पूजा अक्षय फळ देणारी असते.

विशेष उपाय: महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरच्या पूजेचे मोठे महत्त्व आहे. महादेवाला बेलपत्र, पांढरी फुले आणि ऊसाचा रस अर्पण करा. "ओम नमः शिवाय" या मंत्राचा अखंड जप केल्याने मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य लाभते.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीपूर्वी ७ दिवस करा 'हा' उपाय; अनुभवा महादेवाच्या शक्तीचा चमत्कार!

३. सोमवार, १६ फेब्रुवारी: सोमवती अमावास्या (सौभाग्य आणि पितृशांती)

सोमवारी येणारी अमावास्या अत्यंत दुर्मिळ मानली जाते. हा दिवस पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि सौभाग्य वृद्धीसाठी उत्तम आहे.

विशेष उपाय: या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला १०८ वेळा प्रदक्षिणा घातल्याने घरातील गरिबी दूर होते आणि सौभाग्यात वाढ होते.

या तीन दिवसात आवर्जून करण्यासारख्या गोष्टी:

अभिषेक: शक्य असल्यास तिन्ही दिवस महादेवाला शुद्ध जल किंवा दुधाचा अभिषेक करावा.

दान: अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला काळे कपडे, अन्न आणि पाणी दान करणे अत्यंत फलदायी ठरेल.

मौन आणि जप: या तीन दिवसात शक्य तितके मौन पाळून शिव नामाचा जप करावा.

Mahashivratri 2026: यंदाची महाशिवरात्री खास, दोन दुर्मिळ योग एकत्र; इच्छापूर्तीसाठी करा 'हे' छोटेसे काम

English
हिंदी सारांश
Web Title : Mahashivratri 2026: Auspicious Coincidence! These yogas will change your luck.

Web Summary : February 2026 brings a rare combination for Shiva devotees: Shani Pradosh, Mahashivratri, and Somvati Amavasya consecutively. This period offers a golden chance to eliminate Pitru Dosha, Shani Dosha, and planetary afflictions through special remedies and devotion.
टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीAstrologyफलज्योतिषIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Shivaमहादेव