महाशिवरात्री: स्वप्नात महादेवांचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे शुभ संकेत; पाहा, नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 10:32 IST2025-02-25T10:32:08+5:302025-02-25T10:32:37+5:30

Mahashivratri 2025: स्वप्नात देवाचे दर्शन किंवा दृष्टांत होणे शुभ संकेत मानला जातो. स्वप्नांमुळे अनेक गोष्टी साध्य होतात, असे मानले जाते. महाशिवरात्रीला काही गोष्टी स्वप्नात दिसल्यास त्याचे संकेत काय सांगतात?

mahashivratri 2025 know about did see these things related to mahadev in your dreams and its meaning | महाशिवरात्री: स्वप्नात महादेवांचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे शुभ संकेत; पाहा, नेमका अर्थ

महाशिवरात्री: स्वप्नात महादेवांचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे शुभ संकेत; पाहा, नेमका अर्थ

Mahashivratri 2025: प्रत्येक महिन्यात शिवरात्रि व्रत असते. परंतु, माघ महिन्याती शिवरात्रि महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते.   २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी महादेवांचे विशेष पूजन केले जाते. महाशिवरात्रीला शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढते, असे मानतात. देवाने काहीतरी दृष्टांत द्यावा, निर्गुण निराकार देवाचे सगुण साकार रुपात दर्शन व्हावे, असे अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अनेक साधना केल्या जातात. परंतु, महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी स्वप्नात महादेवांचे किंवा महादेवांच्या काही प्रतिकांचे दर्शन होणे, याचा नेमका काय अर्थ होऊ शकतो? जाणून घेऊया...

माणूस जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्ने पाहत असतो. काही स्वप्न पूर्ण होतात, तर काही अपूर्ण राहतात. स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्ने पाहण्याचे अनेक फायदे असल्याचे सांगितले जाते. तसेच काही गोष्टी स्वप्नात का दिसतात, दिसल्या तर त्याचा अर्थ काय असतो, त्या गोष्टी कोणता संकेत देतात, याचाही कयास लावला जातो. वास्तविक पाहता झोपेतील स्वप्ने अनेकदा आठवतही नाहीत. मात्र, काही स्वप्न अशी असतात की, जी कायम स्मरणात राहतात. मात्र, ध्येय, काहीतरी मिळवण्याची इच्छा, यशापर्यंतचा टप्पा यांसह पाहिलेली स्वप्ने माणसाला प्रगतीशील बनवतात. पुढे नेतात. जीवन समृद्ध करतात. ध्येय हे कर्म करण्याची प्रेरणा देते, तर स्वप्न हे त्याला बळकटी देण्याचे काम करते. स्वप्न पाहण्याचे अनेक फायदे आहेत. स्वप्नांमुळे मनाला उभारी मिळते, सकारात्मकता मिळते, ऊर्जा मिळते, आशावाद कायम जागृत राहतो, प्रेरणा मिळते, मनाला शांतता मिळते, पुढे जाण्याची ऊर्मी मिळते, नवनिर्मितीची कल्पकता स्वप्नातून मिळते. माणूस साहस करतो, धाडस करतो, समृद्ध होतो, असे मानले जाते. 

स्वप्नात शिव मंदिराचे दर्शन होणे

स्वप्नात शिवमंदिराच्या पायऱ्या चढत आहात, असे दिसले तर याचा अर्थ जीवनात सुख-शांती नांदेल आणि आर्थिक सुधाराचे संकेत आहेत. तसेच जर शिवमंदिर पाहत असाल तर याचा अर्थ कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकेल. जर कुटुंबासोबत शिवलिंगाची पूजा करताना दिसले तर तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळेल.

स्वप्नात सर्प दर्शन होणे

महाशिवरात्रीला स्वप्नात साप दिसला तर ते खूप शुभ, लाभदायक आणि आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. महादेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि ते लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, असा हा संकेत मानला जातो. तसेच तुम्ही काम करत असाल आणि एखादा साप तुमच्या मागे धावतानाचे स्वप्न पडले, तर ते शुभ लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार असे स्वप्न भविष्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक काळ आणेल. कामाचे कौतुक होईल.

स्वप्नात शिवाचे दर्शन होणे

स्वप्न शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी स्वप्नात शिवलिंग दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. स्वप्नात शिवलिंग पाहणे म्हणजे भगवान शिवाने तुमची पूजा स्वीकारली आहे आणि हे स्वप्न प्रगती आणि कीर्ती प्राप्तीचे लक्षण मानले जाते. जर तुम्ही स्वतः शिवलिंगावर दूध अर्पण करताना पाहिले तर याचा अर्थ भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आशीर्वाद देत आहेत. मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तसेच तुम्हाला पांढरे शिवलिंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात शांती येणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. 

स्वप्नात बेलपत्र वृक्ष, नंदी, रुद्राक्ष दिसणे

- महाशिवरात्रीला स्वप्नात रुद्राक्ष दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते. महाशिवरात्रीला असे स्वप्न पडले तर याचा अर्थ तुमच्या जीवनातील त्रास, दूर होणार आहेत. प्रलंबित काम लवकरच पूर्ण होणार आहे, असे सांगितले जाते. 

- महाशिवरात्रीला स्वप्नात बेलपत्र किंवा बेलपत्राचे झाड दिसले तर ते शुभ मानले जाते. स्वप्नात बेलपत्र दिसणे म्हणजे तुमची आर्थिक समस्या दूर होणार आहे. तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत, असा संकेत मानला जातो. 

- महाशिवरात्रीला स्वप्नात शिवलिंगावर अभिषेक करत असाल तर याचा अर्थ भगवान महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील. अशा व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि त्याच्या आयुष्यात आनंद येणार आहे.

- महाशिवरात्रीला स्वप्नात नंदी दिसल्यास ते शुभ स्वप्न मानले जाते. नंदी हे भगवान भोलेनाथांचे वाहन असून त्यांच्याशिवाय शिव परिवार अपूर्ण मानला जातो. स्वप्नात नंदी दिसणे म्हणजे तुम्हाला शिवाचा आशीर्वाद आणि यश मिळणार आहे, असे म्हटले जाते.  

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: mahashivratri 2025 know about did see these things related to mahadev in your dreams and its meaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.