गजानन महाराज प्रकट दिन, महाशिवरात्री ते होळी; पाहा, मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:15 PM2024-02-29T14:15:31+5:302024-02-29T14:16:32+5:30

Vrat And Festival In March Month 2024: मार्च महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत.

mahashivratri 2024 to holi 2024 know about the important vrat and festival in march 2024 | गजानन महाराज प्रकट दिन, महाशिवरात्री ते होळी; पाहा, मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

गजानन महाराज प्रकट दिन, महाशिवरात्री ते होळी; पाहा, मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

Vrat And Festival In March Month 2024: इंग्रजी कॅलेंडरचा तिसरा मार्च महिना सुरू होत आहे. तर मराठी महिन्याप्रमाणे माघ महिना सुरू आहे. तर मार्च महिन्यात फाल्गुन महिना सुरू होईल. फाल्गुन हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना आहे. माघ महिना अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. माघ महिन्याच्या उत्तरार्धात आणि फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धात अनेक महत्त्वाचे सण-उत्सव, व्रते साजरी केली जाणार आहेत. 

सन २०२४ मधील मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत सण-उत्सव साजरे केले जाणार आहे. श्रावणानंतर महाशिवरात्रीचा दिवस हा शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. महाशिवरात्रीबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. तर माघ महिन्यातील अमावास्येनंतर फाल्गुन महिना सुरू होईल. मार्च महिन्यात दोन एकादशी येणार असून, शेवटच्या आठवड्यात होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरे केले जाणार आहे. तसेच  विनायकी आणि संकष्ट चतुर्थीही आहे. 

मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

- गजानन महाराज प्रकटदिन: ०३ मार्च रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. शेगावसह देश-विदेशात हा दिवस मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो.

- दासनवमी: ०५ मार्च रोजी दासनवमी आहे. या दिवशी शक्ती, भक्ती आणि युक्ती याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी देह ठेवला, ती तिथी दासनवमी म्हणून ओळखली जाते. 

- विजया स्मार्त, भागवत एकादशी: ०६ मार्च आणि ०७ मार्च रोजी विजया स्मार्त आणि भागवत एकादशी आहे. एकादशीला श्रीविष्णूंचे पूजन, नामस्मरण करणे सर्वोत्तम मानले जाते. 

- महाशिवरात्री: ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशी शंकराची केलेली उपासना अतिशय पुण्य फलदायक मानली जाते. 

- माघ अमावास्या: १० मार्च रोजी माघ महिन्याची अमावास्या आहे. तसेच १० मार्च रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यदिन आहे. 

- विनायक चतुर्थी: १३ मार्च रोजी विनायक चतुर्थी आहे. हा दिवस गणपतीच्या पूजन, नामस्मरणासाठी अतिशय उत्तम आणि लाभदायक मानला जातो. 

- आमलकी एकादशी: २० मार्च रोजी आमलकी एकादशी आहे. ही फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी आहे. या दिवशी विषुवदिन आहे. 

- होळी: २४ मार्च रोजी होळी आहे. तर २५ मार्च रोजी धुलिवंदन आहे. २६ मार्चपासून वसंतोत्सवारंभ आहे. 

- संत तुकाराम बीज: २७ मार्च रोजी संत तुकाराम बीज आहे. 

- संकष्ट चतुर्थी: २८ मार्च रोजी मराठी वर्षातील शेवटची फाल्गुन संकष्ट चतुर्थी आहे. तर २९ मार्च रोजी गुड फ्रायडे आहे. ३० मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल.

- संत एकनाथ षष्ठी: ३१ मार्च रोजी संत एकनाथ षष्ठी आहे. संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली, तो फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो. तसेच या दिवशी ईस्टर संडे आहे.


 

Web Title: mahashivratri 2024 to holi 2024 know about the important vrat and festival in march 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.