यंदा १४४ वर्षांनी महाकुंभ योग जुळून आला होता, त्याची सांगता २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. कोट्यवधी भाविकांनी या पर्वात कुंभ स्नानाची संधी मिळवली. मात्र अनेकांना इच्छा असूनही त्यात सहभागी होता आले नाही. अशा लोकांनी निराश न होता, महाकुंभपर्व संपण्याआधी दिलेले उपाय करून शाही स्नानाचे पुण्य घरबसल्या कमवावे.
महाकुंभ दरम्यान विशेष तिथींना केलेल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात. त्यातील शेवटची शाही स्नानाची संधी २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीला असणार आहे. मात्र गर्दीमुळे, कामामुळे, सुटीअभावी ज्यांना महाकुंभातील शाही स्नानासाठी जाता आले नाही त्यांना पुढील ५ टिप्स फॉलो करून शाही स्नानाचा आनंद घेता येईल.
शाही स्नानाचे पुण्य देणारे पाच नियम:
>> गर्दीमुळे महाकुंभात स्नान करता येत नसेल तर जवळच्या कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या घराजवळ नदी नसेल किंवा तुम्ही जाण्यास सक्षम नसाल तर तुम्ही स्नानाच्या पाण्यात देवघरातील गंगाजल मिसळून स्नान करू शकता.
>> घरामध्ये शाही स्नान करताना हे लक्षात ठेवा की तुम्हाला विशेष मंत्राचा जप करावा लागेल, तरच तुम्हाला शाही स्नानाचे पुण्य प्राप्त होईल. घरी शाही स्नान करताना "गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिंधु कावेरी जलस्मीं सन्निधिम् कुरु" या श्लोकाचा अवश्य जप करा. जर तुम्हाला मंत्र उच्चारता येत नसेल तर स्नान करताना गंगा मातेचे ध्यान करा.
>> शास्त्रानुसार कुंभस्नानाच्या वेळी गंगेत ५ वेळा डुबकी मारावी आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू नये. घरी अंघोळ करताना प्राणायाम स्थितीत दोन्ही नाकपुड्या बंद करून डोक्यावरून पाच तांब्या पाणी घ्या.
>> शाही स्नानानुसार ज्या दिवशी शाही स्नान होते, त्या दिवशी उपवास करावा. जर उपास करणे शक्य नसेल तर या दिवशी सात्विक अन्नच खावे. शाही स्नानानंतर लसूण, कांदा, तामसिक किंवा मांसाहार करू नये.
>> स्नानानंतर सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर तुळशीला जल अर्पण करा आणि नंतर ते गरजूंना दान करा. शाही स्नानादरम्यान तुमच्या मनात भक्ती आणि पवित्रता असणे महत्त्वाचे आहे. कारण शाही स्नान तुमचे शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध करते. त्यामुळे घरीही या पद्धतींचा अवलंब करा फळ मिळू शकते.