Chandra Grahan 2023: ५ मे रोजी चंद्रग्रहण: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? शेअर मार्केटवर मोठा परिणाम; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:43 PM2023-04-29T12:43:37+5:302023-04-29T12:44:55+5:30

Lunar Eclipse 2023: मे महिन्याच्या सुरुवातीला लागणाऱ्या चंद्रग्रहणाचा राशींवर, देशावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

lunar eclipse may 2023 impact on all zodiac signs and effect on country and share market and on others of chandra grahan may 2023 | Chandra Grahan 2023: ५ मे रोजी चंद्रग्रहण: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? शेअर मार्केटवर मोठा परिणाम; जाणून घ्या

Chandra Grahan 2023: ५ मे रोजी चंद्रग्रहण: तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? शेअर मार्केटवर मोठा परिणाम; जाणून घ्या

googlenewsNext

Lunar Eclipse 2023: चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण लागते, असे म्हटले जाते. सन २०२३ मधील पहिले चंद्रग्रहण ०५ मे रोजी लागणार आहे. तूळ राशीत स्वाती नक्षत्रात चंद्रग्रहणाचा आरंभ होणार आहे. तर ग्रहणाचा मध्य आणि मोक्ष विशाखा नक्षत्रात होणार असल्याचे सांगितले जात आहे. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्धपौर्णिमेला हे चंद्रग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण प्रतिकूल मानले जाते. ग्रहण काळात धार्मिक कार्ये, शुभ कार्ये केली जात नाहीत. यंदाच्या ग्रहणाचा राशींसह देशावर कसा प्रभाव राहू शकेल? ते जाणून घेऊया... 

चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर उपछाया चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्र ग्रहण म्हणतात. ०५ मे २०२३ रोजी लागणारे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील आहे. ०५ मे २०२३ रोजी रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होणार आहे. तर रात्रौ १० वाजून २३ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तसेच मध्यरात्रौ ०१ वाजून ०२ मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष होईल. छायाकल्प चंद्रग्रहण शास्त्रानुसार पूर्ण ग्रहणासारखे नसते. पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. छायाकल्प चंद्रग्रहणाला अधिक महत्त्व नाही. त्यामुळे धार्मिक पथ्ये किंवा अन्य पथ्ये पाळावीत, असे सांगितले जात नाही. तसेच ग्रहणाचे वेधादि नियमही पाळू नये, असे सांगितले जाते. 

चंद्रग्रहणाला ग्रहांची स्थिती आणि प्रभाव कसा असेल?

चंद्रग्रहणाला गुरु, सूर्य, बुध, राहु हे ग्रह मेष राशीत विराजमान असतील. तर मंगळ आणि शुक्र हे ग्रह मिथुन राशीत असतील. केतु तूळ राशीत असेल. शनी कुंभ राशीत असेल. चंद्रग्रहणाला मंगळ आणि बुधाचा परिवर्तन योग जुळून येईल, असे सांगितले जात आहे. चंद्रग्रहणानंतर शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण केली जात आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. खेळाडूंसाठी चंद्रग्रहण शुभ राहू शकेल. चंद्रग्रहणानंतर देशातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

कोणत्या राशीसाठी कसा असेल चंद्रग्रहणाचा प्रभाव?

चंद्रग्रहण तूळ राशीत होणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव तूळ आणि मेष राशीवर पडू शकेल. या राशींसाठी हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. याशिवाय वृश्चिक, वृषभ, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण प्रतिकूल ठरू शकेल. या राशीच्या लोकांना तणाव आणि त्रास सहन करावा लागू शकतो. तसेच मिथुन, सिंह, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी चंद्रग्रहण एकंदरीत शुभ राहू शकेल. मिथुन राशीच्या लोकांना चंद्रग्रहणानंतर लाभाची संधी मिळू शकेल. मीन राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: lunar eclipse may 2023 impact on all zodiac signs and effect on country and share market and on others of chandra grahan may 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.