Lunar Eclipse: येत्या ८ वर्षात तब्ब्ल २० चंद्रग्रहण, पण सगळीच भारतातून दिसणार का? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:00 IST2025-09-08T12:59:47+5:302025-09-08T13:00:52+5:30
Lunar Eclipse: आकाशात होणारा अद्भुत खेळ आपल्याला चक्रावून टाकतो, येत्या ८ वर्षात चंद्रग्रहणाचे कोणते प्रकार अनुभवता येणार ते जाणून घेऊ.

Lunar Eclipse: येत्या ८ वर्षात तब्ब्ल २० चंद्रग्रहण, पण सगळीच भारतातून दिसणार का? वाचा!
>>प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ ते २०३३ या काळात एकूण २० चंद्रग्रहणे(Lunar Eclipse 2025) होणार आहेत. यामध्ये छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास अशा तिन्ही प्रकारची ग्रहणे समाविष्ट आहेत. या ग्रहणांपैकी काही भारतातून दिसतील तर काही फक्त इतर देशांतूनच पाहायला मिळतील.
चंद्रग्रहणाचे प्रकार :
छायाकल्प (Penumbral Eclipse): चंद्र पृथ्वीच्या हलक्या छायेत येतो.
खंडग्रास (Partial Eclipse): चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या गडद छायेत येतो.
खग्रास (Total Eclipse): पूर्ण चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत शिरतो आणि लालसर दिसतो.
--------------
येणारी महत्त्वाची चंद्रग्रहणे
१) ७ सप्टेंबर २०२५ – खग्रास, भारतातून दिसेल.
२) ३ मार्च २०२६ – खग्रास, भारतात ग्रहणातच चंद्र उगवेल.
३) २८ ऑगस्ट २०२६ – खंडग्रास, भारतातून दिसणार नाही.
४) २० फेब्रुवारी २०२७ – छायाकल्प, भारतातून दिसेल.
५) १८ जुलै २०२७ – छायाकल्प, भारतातून दिसेल.
६) १७ ऑगस्ट २०२७ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.
७) १२ जानेवारी २०२८ – खंडग्रास, भारतातून दिसणार नाही.
८) ६ जुलै २०२८ – खंडग्रास, भारतातून दिसेल.
९) ३१ डिसेंबर २०२८ – खग्रास, भारतातून दिसेल.
१०) २८ जून २०२९ – खग्रास, भारतातून दिसणार नाही.
११) २० डिसेंबर २०२९ – खग्रास, भारतातून दिसेल.
१२) १५ जून २०३० – खंडग्रास, भारतातून दिसेल.
१३) ९ डिसेंबर २०३० – छायाकल्प, भारतातून दिसेल.
१४) ७ मे २०३१ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.
१५) ५ जून २०३१ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.
१६) ३० ऑक्टोबर २०३१ – छायाकल्प, भारतातून दिसणार नाही.
१७) २५ एप्रिल २०३२ – खग्रास, भारतातून दिसेल.
१८) १८ ऑक्टोबर २०३२ – खग्रास, भारतातून दिसेल.
१९) १४ एप्रिल २०३३ – खग्रास, भारतातून दिसेल.
२०) ८ ऑक्टोबर २०३३ – खग्रास, भारतातून दिसेल.
--------------------
भारतासाठी खास!
२०२५ ते २०३३ दरम्यान भारतातून १२ ग्रहणे दिसणार आहेत. यामध्ये ८ खग्रास किंवा खंडग्रास आहेत, जे खगोलप्रेमींसाठी अत्यंत आकर्षक ठरणार आहेत. विशेषतः ७ सप्टेंबर २०२५, ३१ डिसेंबर २०२८, २५ एप्रिल २०३२ आणि ८ ऑक्टोबर २०३३ ही खग्रास चंद्रग्रहणे सर्वाधिक रोमहर्षक ठरणार आहेत.
-----------------
खगोलशास्त्र प्रेमींसाठी ही एक सोन्याची संधी असून आकाशातील हा अप्रतिम देखावा नक्की अनुभवावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.