आज ३ मार्च २०२६ रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. या खगोलीय घटनेसोबतच आपल्याकडे अनेक सामाजिक आणि धार्मिक परंपरा जोडल्या गेल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आजही ग्रहण सुटल्यानंतर दान करण्याची पद्धत आवर्जून पाळली जाते. मात्र, काळाच्या ओघात या परंपरेतील मूळ अर्थ आणि विधीमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चंद्रग्रहण २०२६: मेष ते मीन, कोणत्या राशींना लागणार बंपर लॉटरी आणि कुणाला सोसावा लागणार तोटा?
आजचे खग्रास चंद्रग्रहण सुटल्यानंतर गावागावांतून एक ओळखीचा आवाज येईल— 'दे दान सुटे गिऱ्हाण' खरं तर 'गिऱ्हाण' हा शब्द 'ग्रहण' या शब्दाचा ग्रामीण अपभ्रंश. शहरात ही प्रथा कमी झाली असली, तरी गावाकडे आजही ग्रहण संपल्यावर गरजू लोक दारोदारी जाऊन दान मागतात. मात्र, हे दान करताना आपण 'काय' देतोय, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
१. अन्नदान की वस्त्रदान?
अनेकांना ग्रहण सुटल्यावर अन्न दान करण्याची सवय असते. पण वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद सांगते की, ग्रहण काळात वातावरणातील नकारात्मक किरणांमुळे अन्नावर परिणाम होतो. जरी आपण अन्नावर 'तुळशी पत्र' ठेवून ते शुद्ध राखण्याचा प्रयत्न केला, तरी ते अन्न दान करण्याऐवजी ताजे अन्न बनवून दान करणे अधिक श्रेयस्कर ठरते. ग्रहण काळातील शिळे अन्न कोणाला देणे हे पूर्णतः उचित नाही.
२. पैशांचे दान किती काळ पुरणार?
काही लोक श्रद्धेपोटी गरिबांच्या झोळीत काही नाणी किंवा नोटा टाकतात. मात्र, सध्याच्या महागाईच्या काळात थोडे पैसे कोणाचे आयुष्य बदलू शकत नाहीत. त्यामुळे पैशांपेक्षा अशा वस्तूंचे दान करा जे त्यांच्या खरंच उपयोगाला येतील.
३. 'जुनं द्या, नवीन घ्या' – धागा की पूर्ण वस्त्र?
एक जुनी परंपरा अशी आहे की, ग्रहण सुटल्यावर वस्त्राचा एक धागा तोडून तो आकाशाच्या दिशेने टाकला जातो आणि 'जुनं गेलं, नवीन आलं' असं म्हणून ग्रहणातून मुक्त झाल्याचं मानलं जातं. पण हा केवळ एक प्रतिकात्मक विधी झाला. त्यापेक्षा, तुमच्या घरातील चांगले पण न वापरलेले कपडे किंवा नवीन वस्त्र दान केले तर एखाद्या गरजू व्यक्तीचे शरीर झाकले जाईल. हे 'वस्त्रदान' खऱ्या अर्थाने पुण्यदायी ठरेल.
यंदाच्या ग्रहणासाठी महत्त्वाचा संदेश:
आजच्या काळात दान म्हणजे केवळ विधी पूर्ण करणे नव्हे, तर 'माणुसकी' जपणे आहे. तुम्ही दिलेला एखादा जुना पण चांगला शर्ट किंवा साडी एखाद्या गरिबाची दिवाळी साजरी करू शकते. ग्रहणाचे सावट दूर झाल्यावर आपल्या मनातली दातृत्वाची भावना जागी होणे, हेच खरे शुद्धीकरण आहे.
Vastu Tips: झोपताना उशाशी पाण्याची बाटली ठेवता? तुमची ही छोटी चूक ठरू शकते मोठ्या तणावाचं कारण!
ग्रहण किती वाजता सुटणार?
खग्रास ग्रहण समाप्त (Total Phase Ends): सायंकाळी ५:४४ वाजता
ग्रहणाचा मोक्ष (Partial Phase Ends): सायंकाळी ६:५८ वाजता
(भारतात ग्रहणाचे वेध सकाळी ६ वाजल्यापासूनच पाळणे शास्त्रशुद्ध मानले जाईल.)
Web Summary : The 2026 lunar eclipse emphasizes thoughtful donations. Avoid stale food; donate fresh items or useful clothes instead of money. Prioritize humanity over ritual, offering meaningful help to the needy after the eclipse.
Web Summary : २०२६ चंद्रग्रहण में विचारशील दान का महत्व है। बासी भोजन से बचें; इसके बजाय ताज़ी चीजें या उपयोगी कपड़े दान करें, पैसे नहीं। रस्मों से ज्यादा मानवता को प्राथमिकता दें, ग्रहण के बाद जरूरतमंदों को सार्थक मदद दें।