मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:20 IST2025-09-04T14:15:37+5:302025-09-04T14:20:16+5:30

Chandra Grahan 2025 Panchak: खग्रास चंद्रग्रहणात काय करावे अन् काय करू नये? खग्रास चंद्रग्रहण वेध ते मोक्ष काळ जाणून घ्या...

lunar eclipse 2025 in mrityu panchak 2025 when is sutak kaal start know about what to do and what should avoid in khagras chandra grahan september 2025 | मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम

मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम

Chandra Grahan 2025 Panchak: यंदाच्या चातुर्मासातील भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण लागते, असे म्हटले जाते. परंतु, भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असणार आहे. त्यामुळे देश-दुनियेवर अशुभाची छाया, प्रतिकूल प्रभाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे. 

सूर्य-चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात. म्हणजेच सूर्य अमावास्येला अगर चंद्र पौर्णिमेला राहुच्या किंवा केतुच्या जवळच असावा लागतो. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. भाद्रपद पौर्णिमेला चंद्र ग्रह कुंभ राशीत आहे. याच राशीत राहु आहे. तर समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य, केतु आणि बुध आहेत. बुधादित्य राजयोगात २०२५ मधील खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो, तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते. 

मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण

ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. शनिवारी पंचक सुरू झाले तर त्याला मृत्यू पंचक असे म्हटले जाते. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०४.०३ वाजता पंचक समाप्त होणार आहे. मृत्यू पंचक अतिशय कष्टदायी, प्रतिकूल मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते. रविवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. 

खग्रास चंद्रग्रहण भारतासह कुठे दिसणार?

२०२५ मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे सांगितले जात आहे. भारतासह हे खग्रास चंद्रग्रहण युरोप, आशिय खंडातील सगळे देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, आफ्रिका, पश्चिम उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशात दिसेल. इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स सारख्या युरोपातील जवळजवळ सर्व देशांमध्ये दिसेल. 

खग्रास चंद्रग्रहणात काय करावे अन् काय करू नये
 
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहण कालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने दुपारी १२.३७ पासून ग्रहणमोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेधकाळात आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे ही कर्मे करता येतात. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी ५.१५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.

ग्रहणाचे राशिपरत्वे फल: मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभफल; मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्रफल; कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.

खग्रास चंद्रग्रहण: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५

खग्रास चंद्रग्रहण वेध सूतक काल: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून सुरू.

खग्रास चंद्रग्रहण स्पर्श: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण संमीलन: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ११ वाजता.

खग्रास चंद्रग्रहण मध्य: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ११ वाजून ४२ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण उन्मीलन: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ १२ वाजून २३ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण  मोक्ष: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ०१ वाजून २७ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण पर्वकाळ: ३.३० तास.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.


 

Web Title: lunar eclipse 2025 in mrityu panchak 2025 when is sutak kaal start know about what to do and what should avoid in khagras chandra grahan september 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.