शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

या जगण्यावर शतदा प्रेम करावे..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 00:44 IST

जीवन उत्साहाने जगण्यासाठी त्याच्यासमोर काही आव्हाने असणे गरजेचे आहे.

बाल, तारुण्य , प्रौढ आणि वृद्ध अशा चार अवस्था माणसाच्या जीवनात क्रमाने येत असतात. पैकी पहिल्या तीन अवस्था जगताना माणूस उत्साहात असतो कारण तिथे रोज काहीना काही नवीन घडत असतं किंवा नवीन काहीतरी घडवण्याच्या उमेदीत तो असतो. तोपर्यंत त्याला जीवन जगायची असोशी असते. 

साठीच्या पुढे ज्याचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असतं तोही तसा उत्साहात असतो. कारण त्याला पूर्वी नोकरीमुळे मोकळा वेळ मिळालेला नसल्याने देशांतर्गत पर्यटन , परदेशवारी करायला वेळ मिळालेला नसतो पण आता त्याला ते शक्य असतं. हे सगळं पासष्टीपर्यंत उरकतं. मग मात्र रिकामा वेळ त्याला खायला उठतो. हळूहळू प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू होतात आणि मग गाडी हळूहळू उताराला लागते.

वयोमानानुसार प्रकृतीची साथ मिळेनाशी होते. तसेच हळूहळू घरातले महत्वही कमी होत जाते. मत विचारात न घेता परस्पर महत्वाचे निर्णय घेतले जातात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मनुष्य हळूहळू जीवनाला कंटाळू लागतो.. पण म्हणून काही जगणे सोडता येत नाही. आयुष्य आहे तोवर जगावेच लागते पण ती एक कंटाळवाणी यात्रा ठरते. शेवटीशेवटी तर कधी सुटका होईल असे वाटत राहते. 

 जीवन उत्साहानं जगण्यासाठी माणसासमोर काही आव्हान असणं आवश्यक आहे. कारण आव्हानाची पूर्तता करण्यात माणूस गुंतून पडतो. पण म्हातारपणी माणसापुढे एकदम असे आव्हान कसे उभे राहील ? म्हणजे असे आव्हान कोणते ते हुडकण्याची तयारी जो पूर्वायुष्यात करेल त्याला उत्तरायुष्यात त्या आव्हानाचा सामना करण्यात वेळ चांगला गेल्यामुळे कंटाळा येणार नाही. उलट त्याचा उत्साह उत्तरोत्तर वाढता राहील. 

माणूस ही भगवंतांचीच निर्मिती असल्याने माणसाला आयुष्याचा कंटाळा येऊ नये यादृष्टीने स्वच्या स्वरूपाचा शोध हे आव्हान भगवंतांनी त्याच्यापुढे उभे केले आहे पण  भगवंत ज्याप्रमाणे प्रकृतीत म्हणजेच त्यांच्याच मायाशक्तीत गुंतून पडून एकाचे अनेक झालेत त्याप्रमाणे मनुष्य हाही भगवंतांचा अंश असल्याने मोहमायेच्या जंजाळात गुंतून स्वतःचं मूळ स्वरूप विसरून स्वतःभोवतीची आवरणं वाढवत जातो. जीवनामध्ये जेवढ्या लवकर हा गुंता लक्षात येईल तितक्या तीव्रतेने मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आणि तो गुंता सोडवण्यातला आनंद घेत घेत कधी अंतिम समय आला हे त्याचं त्यालाही कळणार नाही. म्हणजेच शेवटपर्यंत त्याला जगवंस वाटत राहतं.

 एव्हढंच नाही तर त्याला स्वतःच्या स्वरूपाचा शोध घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच जाते मग त्यात त्याला वाढतं वय , प्रकृती , समाजातील उपेक्षा या कशाचाही अडथळा जाणवत नाही..

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना