सोमवार ६ ऑक्टोबरची रात्र ही कोजागरी पौर्णिमेची(Kojagiri Purnima 2025) रात्र आहे. संपूर्ण वर्षातली ही मोठी पौर्णिमा मानली जाते. या रात्री चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. या दिवशी चंद्राची तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्या आयुष्यात शीतलता आणि संपन्नता यावी म्हणून प्रार्थना केली जाते. सोबतच केला जातो एक खास उपाय; कोणता ते जाणून घेऊ.
ज्योतिषी अरुण कुमार व्यास सांगतात, 'कोजागरीची' रात्र इतर रात्रीच्या तुलनेत अतिशय महत्त्वाची असते. या रात्री केलेली पूजा फळते आणि तुमचे दुःख, दारिद्रय संपुष्टात येऊन तुम्हाला संपन्नता प्राप्त होते. कारण या रात्री, माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतीर्ण होऊन घराघरात डोकावते आणि कोण जागे आहे हे पाहते. ही जागृती कामाप्रती, कर्तव्याप्रती, सजगतेविषयी आहे का ते पाहते. न झोपणे म्हणजे जागे असणे नाही, तर सावध असणे म्हणजे जागृत असणे. अशी जागरूकता लक्ष्मी मातेला अभिप्रेत असते. म्हणून ती 'कोsss जागर्ति' असे पाहते आणि जो कष्टाळू, प्रामाणिक, सावध आणि देव, देश, धर्माप्रती जागरूक आहे, त्याला भरभरून वरदान देते, संपन्न करते.
Kojagiri Purnima 2025: कोजागरीच्या सायंकाळी होतो भोंडल्याचा समारोप; काय असते खिरापत?
यासाठीच एक उपायही ज्योतिष शास्त्रात सुचवला आहे, जो कोजागरीच्या रात्री प्रत्येकाला करता येईल. तो उपाय पुढीलप्रमाणे :
>> कोजागरीच्या रात्री तांदळाची खीर करा. >> गच्चीत किंवा अंगणात ती खीर ठेवा. >> त्यात चंद्रप्रकाश पडला पाहिजे याची काळजी घ्या. >> खिरीच्या वाटीत १ रुपयाचे नाणे टाका. >> ती खीर रात्रभर चांदण्याच्या प्रकाशात राहू द्या. >> दुसऱ्या दिवशी सकाळी खीरीतून नाणे काढून ते धुवून घ्या. >> खिरीचा नैवेद्य घरातील प्रत्येक सदस्याला द्या. >> १ रुप्याचे नाणे आपल्या तिजोरीत ठेवा.
हा उपाय केला असता दुःख, दैन्य, दारिद्य्र दूर होऊन वास्तू संपन्न होते, व्यक्तीची तसेच कुटुंबीयांची प्रगती होते असे म्हणतात. त्यामुळे कोजागरीच्या रात्री लक्ष्मी कृपेची ही संधी दवडू नका. पहा अरुण व्यास यांचा व्हिडीओ -
Web Summary : On Kojagiri Purnima, performing Lakshmi puja and keeping a one-rupee coin in kheer under moonlight brings prosperity. Astrologer Arun Kumar Vyas advises this remedy to eliminate poverty and ensure progress for the family.
Web Summary : कोजागिरी पूर्णिमा पर, लक्ष्मी पूजा करने और एक रुपये का सिक्का खीर में चांदनी में रखने से समृद्धि आती है। ज्योतिषी अरुण कुमार व्यास गरीबी को दूर करने और परिवार की प्रगति सुनिश्चित करने के लिए यह उपाय बताते हैं।