शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Kojagiri Purnima 2023: नवरात्रीत भोंडला खेळायचा राहून गेला? कोजागिरीला खेळ 'हा' मजेशीर खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 2:20 PM

Kojagiri Purnima 2023: भोंडल्यात अनेक गमती जमती असतात, त्या गमती जमती खेळता खेळताच 'बालाजीची सासू मेली'... घाबरू नका या वाक्यामागची गंमत वाचा!

२८ ऑक्टोबर रोजी कोजागिरी आहे. ज्यांचा नवरात्रीत भोंडला खेळायचा राहून गेला, त्यांनी कोजागिरीला भोंडला खेळावा. या खेळात एक मजेशीर खेळ खेळा. कोणता ते पाहू - बालाजीची सासू मेली!

कोण बालाजी, त्याची सासू कोण, ती कधी मेली? हो! हो! हो! सांगते. तुमच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देते. त्याआधी मला एक खुलासा करू द्या. ही काही कोणाच्या निधनाची वार्ता नाही, तर हा आहे, एक गमतीशीर खेळ, भोंडला! मनोरंजन आणि परंपरा यांचा सुंदर मेळ! नवरात्रीची ओळख. पूर्वीच्या ताई-माई, आक्कांना क्षणिक मोकळीक. तिही 'ऐलमा, पैलमा, गणेश देवा'च्या साक्षीने...

‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’, या जीवनसूत्रात अडकलेल्या स्त्रियांना या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने थोडीशी विश्रांती, मनोरंजन, पोटभर गप्पा आणि खिरापतीची मेजवानी. हे स्वरूप आहे, नवरात्रीत घरोघरी खेळल्या जाणाऱ्या भोंडल्याचा. असे कार्यक्रम, उत्सव, भेटी-गाठीचे प्रसंग हे पूर्वीचे मनोरंजनाचे माध्यम होते. आता, मनोरंजनाची साधने वाढली, परंतु मनोरंजन करून घ्यायला वेळच अपुरा पडू लागला. तरीदेखील, काही हौशी मैत्रिणी आपली परंपरा, संस्कृती टिकवून आहेत. कमी-अधिक प्रमाणात गावात, शहरात आजही भोंडल्याचा खेळ रंगतो. 

त्याच सणांपैकी एक सण, उत्सव, समारंभ म्हणजे आजचा हादगा. भाद्रपद प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत होतो. खांदेशात भोंडला, विदर्भात भुलाबाई भुलोजी, पश्चिम महाराष्ट्रात हादगा भुलोजी, (शंकर पार्वती) यांची पुजा करतात. आश्विन पौर्णिमेपर्यंत ही जगन्मातेची पुजा चालते. रोज एका नव्या घरी किंवा एकाच मोठ्या घरी, ओसरीत वा अंगणात किंवा शहरात मोठ्या सभागृहात भोंडला खेळतात. रोज एकेक भोंडल्याची गाणी वाढवत नेतात. कित्येक वेळेला एकाच दिवशी तीन तीन घरातही एकानंतर एक खेळवला जातो. देवीची विविध वयातली रुपे तेथे विविध कुटुंबातून प्रगट होतात. बालिका, गौरी, षोडशा, तरुणी, प्रौढा, वृद्धा. जशा सप्त मातृकाच जणू. ते तेजच सांगते- ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐंद्राणी, चामुंडा!

पाटावर दोन भुलाबाई भुलोजी मांडून, एक हत्तीचे चित्र काढून पुजा करतात. त्याच्याभोवती फेर धरून गाणी, नाच, हास्याविनोद चालू असतात. एक सूर एक ताल. ‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडीला, करीन तुझी सेवा’ सर्वपरिचित गाणे, प्रथम म्हटले जाते. टिप‍ऱ्या, म्हणजे गुजराती गरबाच.  नाही तर आहेतच आपल्या हस्ततालिका. सगळ्यांचे पाय थीरकतातच. खरे तर ही पर्जन्यपुजा. मेघ पुजा. हत्तीसारखे काळेकुट्ट ढग. धरतीला चिंब भिजवतात. जलकृपा करतात. हिरवागार शालू पृथ्वीला नेसवतात. शेती संस्कृतीचे हे समृद्धीचे प्रतीक. धरती आई आणि मेघ बाप. म्हणून हस्त नक्षत्राला महत्व. तेच प्रतीक पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते. पूर्वी सगळ्या वयोगटातल्या महिला वर्गाची गाणी पाठ असत, आता रेकॉर्ड लावून फेर धरतात, पण खेळतात, हे महत्त्वाचे.

भोंडल्यातली गाणी ऐकली, तर लक्षात येईल, यात स्त्री मनाचा संवाद आहे. सुख-दु:ख सांगणार कोणाला? माहेर कोसो दूर, मैत्रिणीशी रोजच्या गप्पा नाही. झाकली मूठ अशा निमित्ताने काव्यातून खुलते आणि शेजारच्या, पाजारच्या काकू, आत्या, आजी, मावशी यांच्याकडून जखमेवर मायेची फुंकर घातली जाते. भोंडल्याची गाणी लोकगीतांचा वारसा सांगणारी आहेत. तत्कालीन समाजाचे चित्र त्यातून प्रगट होते. कालानुरूप त्यातही बदल झाले आहेत. अनेक कवयित्रींनी आपली प्रतिभा पणाला लावून कालानुरूप त्यात बदल केले आहेत. मात्र, या खेळातला उत्साह आजही टिकून आहे.

भोंडला खेळून दमलेल्या सख्यांना श्रमपरिहार म्हणून खाऊ देण्याची पद्धत. परंतु, तो देण्याआधी ओळखायचा. बंद डबा वाजवून, क्ऌप्ती लढवून, वेगवेगळ्या पदार्थांचे नाव घेत खाऊ ओळखण्याचा कार्यक्रम चाले. त्यातूनच जन्माला आली आणि 'श्री बालाजिचि सासु मेली.' या वाक्यातली सगळी अद्याक्षरे खाऊची नावे आहेत.श्री-श्रीखंड, बा-बालुशाही, जि-जिलेबी, चि-चिवडा, सा-साठोऱ्या, सु- सुधारस, मे- मेवा, ली- तोही मीच सांगायचा? तेवढा एक प्रकार तरी तुम्ही ओळखाच! बघुया बरं, कोणाला खाऊ ओळखता येतोय ते...!

आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी,आत पडला शिंपला, आमचा भोंडला संपला!

टॅग्स :kojagariकोजागिरी