Know their symptoms to identify Sadhguru; In the live program from Swami Shantigiriji Maharaj! | सद्गुरुंना ओळखण्यासाठी त्यांची लक्षणे जाणून घ्या; स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून live कार्यक्रमात!

सद्गुरुंना ओळखण्यासाठी त्यांची लक्षणे जाणून घ्या; स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून live कार्यक्रमात!

आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदशकाची गरज असते. बालवयात आई, बाबा, शाळेत शिक्षक, मोठेपणी समाज, ग्रंथ आणि उर्वरित आयुष्यात अनुभव अशी गुरुंची विविध रूपे आहेत. परंतु हे गुरु व्यावहारिक जगातले, अध्यात्मिक जगातले नाहीत. अध्यात्माचा मार्ग धरायचा तर सद्गुरूंचा हात हातात हवा. यासाठी सद्गुरूंची प्राप्ती व्हायला हवी. पण सद्गुरू शोधायचे कुठे, ओळखायचे कसे, त्यांची लक्षणे कोणती, यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत स्वामी शांतिगिरीजी महाराज, २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या युट्यूब चॅनेलवर. त्यांना लाईव्ह ऐकण्याची अद्वितीय संधी दवडू नका. 

स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा मोठा शिष्यपरिवार आहे. ते जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी असंख्य व्यसनी जीवांना व्यसनमुक्त केले. संसारात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना श्रमभक्ती शिकविली. सत्संगाच्या माध्यमातून अनेक पदभ्रष्ट झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. 

स्वामी शांतिगिरीजी महाराज कृषी आणि ऋषी संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. शेतकरी संकटात सापडला तर त्याच्यासाठी पर्जन्ययाग यज्ञ करणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून त्यांनी दाखवून दिले आहे.आज कोरोना संकटातून देशाला नव्हे तर विश्वाला मुक्ती मिळावी म्हणून दैनंदिन होम हवन, महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना भोजनाची व्यवस्था सुरू आहे. आज प्रत्येक आश्रमात दोन वेळचे मोफत भोजन अन्नदान सुरू आहे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक जीवाला शांती मिळावी म्हणून सतत प्रयत्नशील राहणे. असे अनेक समाजपयोगी कार्य स्वामी शांतिगिरीजी बाबा करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वेळेस हजारो साधू संतांना, संन्यासी महाराजांना भोजन देणे, वृक्षारोपण करणे, फळ फुलांच्या झाडांची देखभाल व संरक्षण करणे. असे अनेक उपक्रम स्वामी शांतिगिरीजी बाबा आश्रमाच्या वतीने करत असतात. 

स्वामीजींच्या प्रासादिक वाणीतून सद्गुरूंची ओळख पटवून घेण्यासाठी आजच लॉग ऑन करा आणि सबस्क्राईब करा, लोकमत भक्ती युट्यूब चॅनेल. आणि ऐकायला विसरू नका, २८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता, ' सद्गुरूंची लक्षणे. '

Web Title: Know their symptoms to identify Sadhguru; In the live program from Swami Shantigiriji Maharaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.