खोट्या शपथा घेतल्यानं काय होतं? प्रेमानंद महाराजांनी स्पष्टच सांगितलं! जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:52 IST2025-08-28T12:51:48+5:302025-08-28T12:52:41+5:30
एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...

खोट्या शपथा घेतल्यानं काय होतं? प्रेमानंद महाराजांनी स्पष्टच सांगितलं! जाणून घ्या
वृंदावनचे सुप्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या शब्दांनी सर्वांची मने जिंकतात. याच वेळी, ते आपल्या संभाषणातून काही अशा गोष्टी सांगतात, ज्यामुळे लोकांना सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय त्यांच्या अनेक शंकाही दूर होतात. अलिकडेच एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की, जे लोक खोट्या शपथा घेतात, त्याचे काय परिणाम होतात? आपण आपल्या भोवताली बघितले असेल की, अनेक लोकांना कुठल्याही गोष्टींवर शपथा घेण्याची अथवा देण्याची सवय असते, यासंदर्भात काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून घेऊयात...
खोट्या शपथा घेतल्याने काय होते? -
नुकतेच एका प्रवचनादरम्यान प्रेमानंद महाराजांनी खोट्या शपथा घेतण्याचे काय परिणाम होतात, हे सांगितले? ते म्हणतात, शपथा घेणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. शपथा घेणे हा काही खेळ नाही. गंभीर वचन म्हणून त्याकडे बघायला हवे. शास्त्रात असे सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीने आपले वचन मोडले, तर त्याच्याकडून केली गेलेली मागील सर्व पुण्य संपुष्टात येतात. यामुळे पावला-पावलावर शपथा देतात अथवा घेतात योगेय नाही.
सत्य बोलणे, सर्वात मोठी ताकद -
प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले, एखाद्याला सत्य सिद्ध करण्यासाठी शपथ घेण्याची गरज नाही. यासाठी विश्वास आवश्यक आहे. खरे बोलणे ही देखील एक मोठी ताकद आहे. जे लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शपथ घेण्यास सांगतात, ते मान्य होत नाही. शपथ ही नेहमी स्वेच्छेनेच घ्यायला हवी. उदाहरण देत प्रेमानंद महाराज, म्हणाले, जर एखाद्याला व्यसन सोडायचे असेल तर प्रथम एक महिना ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि जर ते शक्य झाले नाही, तरच शपथ घ्यावी.