शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

Numerology: तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? शुक्र-लक्ष्मी कृपा; पैसे कमावण्यात एक्सपर्ट, कामे होतात पटापट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 08:42 IST

Numerology: शुक्र-लक्ष्मी देवीच्या शुभाशिर्वादामुळे या व्यक्ती मनी माइंडेड असतात. त्यांना विलासी जीवन जगायची आवड असल्याचे सांगितले जाते. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...

Numerology: भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरांमध्ये अनेकविध गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये ज्योतिषशास्त्राचाही समावेश होतो. ज्योतिषशास्त्रात अनेकविध शाखा आहेत. या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह स्वराशीतून म्हणजेच तूळ राशीतून मंगळ ग्रहाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत विराजमान होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या मूलाकांच्या व्यक्तीवर शुक्रासह लक्ष्मी देवीची कृपा असल्याचे सांगितले जाते. शुक्र आणि लक्ष्मीच्या शुभाशिर्वादामुळे हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते, असे म्हटले जाते. 

कोणत्या क्षेत्रात मिळते अपार यश?

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती मीडिया, फॅशन डिझायनिंग किंवा अभिनयाचा कोर्स केला तर त्यांना चांगले यश मिळू शकते. यासोबतच कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यापार, उद्योग, व्यवसाय खूप प्रगती देऊ शकतो. फिक्कट निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग या मूलांकांच्या व्यक्तींसाठी सर्वांत शुभ मानला जातो.

पैसे कमवण्याची जबरदस्त हौस

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती आकर्षक असतात. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. या लोकांना पैसे कमवण्याची जबरदस्त हौस असते. त्यासाठी ते कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही मेहनत घेतात. या लोकांना मनी माइंडेड असेही म्हणतात.

पैसे खर्च करण्याचीही असते आवड 

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती शिक्षणातही चांगल्या असतात. ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसाही कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड आहे. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडते. या लोकांची कामे शुक्राच्या प्रभावाखाली होत असतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष