शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

Janmashtami 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी कशी करावी विधिवत कृष्णपूजा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:54 IST

Janmashtami 2025: प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ति असते, जन्मोत्सवाला तिची विधिवत पूजा कशी करता येईल ते जाणून घ्या.

आपल्या देवतघरात अन्नपूर्णा माता, शिवलिंग, दत्त गुरु, गणपती आणि बाळकृष्ण या देवता असतातच. याशिवाय आपण ज्यांची उपासना करतो ते देवही असतात. शास्त्रानुसार या देवतांच्या पूजेइतकीच बाळकृष्णाची पूजा महत्त्वाची आहे. त्यासाठी वेगळे उपचार करायची गरज नाही, फक्त आपल्याला काही आवश्यक बदल करावे लागतील. १५ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी (Janmashtami 2025) आहे, त्यानिमित्त हे बदल जाणून घेऊ. 

भगवान श्रीकृष्ण ज्यांनी आपला परममित्र सुदामा याला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन न मागता सगळे काही दिले. तर आपणही श्रीकृष्णाची मनोभावे उपासना केली असता आपल्यालाही भौतिक, पारमार्थिक सुखं मिळतील असा दिलासा ज्योतिषशास्त्राने दिला आहे. ती पूजा कशी असायला हवी ते पाहू. 

Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीही

बहुतेक सर्व घरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेली प्रतिमा किंवा मूर्ती असते. या मूर्तीची विधीवत पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक धारणा आहे. असे मानले जाते की लाडू गोपाळाची योग्य प्रकारे पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि सौभाग्य वाढते. 

अशी आंघोळ घाला : 

सकाळी स्नान करून मंदिर स्वच्छ करावे.  बाळकृष्णाच्या मूर्तीला रोज पाण्याने स्नान घालावे. फक्त पाण्यात तुळशीची चार पाच पाने टाकावीत. कारण कृष्णाला तुळस प्रिय आहे. शक्य असल्यास पंचामृताने स्नान घालावे.  दूध, दही, मध, गंगाजल आणि तूप यांच्या मदतीने पंचामृत बनवावे.

Shravan Special 2025: श्रावणात का करतात सत्यनारायण पूजा? काय मिळते फळ? जाणून घ्या!

बाळलेणी घाला :

श्रीकृष्णाचे बालरूप कोणाही मनाला सहज भावते. कृष्णाष्टमीला आपण त्या मूर्तीला जसे सजवतो, तसे एरव्ही सुद्धा शक्य आल्यास बाळलेणी घालावीत. बाळाला मुकुट, दागिने, बासरी द्यावी. तसे केल्याने कृष्ण कृपा होण्यास मदत होते. 

Janmashtami 2025: गोंदवल्याच्या वाटेवर आहे प्राचीन कृष्णमंदिर; चमत्कारी आहे त्याचा इतिहास!

श्रीकृष्णाच्या नावे दान : 

बाळकृष्णाच्या कृपेने आपल्या घरात सुबत्ता यावी हे जसे आपल्याला वाटते, तसेच आपणही दुसऱ्यांच्या संसाराला हातभार लावावा. यथाशक्ती दानधर्म करावा. लहान मुलांना बोलावून खाऊ द्यावा. एखादी लेकुरवाळी स्त्री घरी आली असता तिची खणानारळाने ओटी भरून तिच्या बाळाला खाऊ किंवा शक्य तेवढे पैसे द्यावे, खेळणं द्यावे, गरीब मुलांना शालेय उपयोगी वस्तू द्याव्यात. 

थोडक्यात आत्मा ते परमात्मा हा प्रवास पार करण्यासाठी आधी दुसऱ्यांच्या आनंदाला हातभार लावावा, जेणेकरून भगवंत आपल्या सुखाची काळजी घेतो. घरातील सुख, समृद्धीसाठी दिलेले उपाय अवश्य करा. 

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीLord Krishnaभगवान श्रीकृष्णPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण