शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

Janmashtami 2021 : श्रीकृष्णजन्माचा मुहूर्त, पूजाविधी आणि कृष्णजन्माचा पाळणा याची सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:33 IST

Janmashtami 2021 : अनेक भाविक या दिवशी उपास करतात व दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा प्रसाद ग्रहण करून उपास सोडतात.

अंधःकारात प्रकाशाची वाट दाखवणारा, दैत्यांचा कर्दनकाळ ठरणारा, आपल्या बासुरीने सर्वांना मोहून टाकणारा आणि जगाला तत्वाज्ञाचे ज्ञानामृत पाजणारा भगवान श्रीकृष्ण याचा जन्मसोहळा अर्थात जन्माष्टमीचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. यंदाही हा उत्सव 'गोविंदा रे गोपाळा' या गजरात पार पडणार आहे. 

श्रावण वद्य अष्टमीला पूर्वरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. ही वेळ रात्री १२ वाजून ४० मिनिटे गृहीत धरली जाते. त्या मुहूर्तावर कृष्णाचा जयघोष करून जन्म झाला असे कथा कीर्तनातून घोषित केले जाते. फटाके फोडून, वाद्य वादन, टाळ-नामाचा गजर करून कृष्ण जन्म झाल्याची वर्दी दिली जाते. या वर्षी हा उत्सव ३० ऑगस्ट २०२१, सोमवारी साजरा केला जाईल. 

कोव्हीडमुळे अद्याप मंदिर देवदर्शनासाठी खुले नसले, तरी घराघरात हा उत्सव मोठ्या उत्साहात केला जातो. देवघरातल्या बाळकृष्णाला छोटासा पाळणा करून त्यात जन्माच्या मुहूर्तावर पाळण्यात जोजवले जाते. नवीन वस्त्र परिधान केली जातात. हार घातला जातो. लोणी किंवा दही साखरेची वाटी देवासमोर ठेवली जाते. गुलाल, फुलं उधळून कृष्णाचा जयघोष केला जातो. केळं, पेढे, पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक भाविक या दिवशी उपास करतात व दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा प्रसाद ग्रहण करून उपास सोडतात. 

कृष्णजन्माचा मुहूर्त : 

२९ ऑगस्टच्या रात्री ११. २५ ते  ३० ऑगस्टच्या रात्री १.५९ पर्यंत राहील अष्टमीची तिथी राहील. 30 ऑगस्टच्या रात्री ११.५९ ते १२. ४४ मिनिटांपर्यंत असेल कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जाईल. यात पूजेचा कालावधी फक्त ४५ मिनिटांचा असेल. 

कृष्ण जन्माचा पाळणा : 

बाळा जो जो रे कुळभूषणा । श्रीनंदनंदना ।निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥धृ॥

जन्मुनि मथुरेत यदुकुळी । आलासी वनमाळी ।पाळणा लांबविला गोकुळी । धन्य केले गौळी ॥१॥

बंदिशाळेत अवतरुनी । द्वारे मोकलुनी ।जनकशृंखला तोडुनी । यमुना दुभंगोनी ॥२॥

मार्गी नेतांना श्रीकृष्णा । मेघनिवारणा ।शेष धावला तत्क्षणा । उंचावूणी फणा ॥३॥

रत्‍नजडित पालख । झळके आमोलिक ।वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ॥४॥

हालवी यशोदा सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥५॥

विश्‍वव्यापका यदुराया । निद्रा करी बा सखया ।तुजवरि कुरवंडी करुनिया । सांडिन मी निज काया ॥६॥

गर्ग येऊनी सत्वर । सांगे जन्मांतर ।कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥७॥

विश्‍वव्यापी हा बालक । दृष्ट दैत्यांतक ।प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥८॥

विष पाजाया पूतना । येता घेईल प्राणा ।शकटासुरासी उताणा । पाडिल लाथे जाणा ॥९॥

उखळाला बांधता मातेने । रांगता श्रीकृष्ण ।यमलार्जुनांचे उद्धरण । दावानव प्राशन ॥१०॥

गोधन राखिता अवलिळा । कालिया मर्दीला ।दावानल वन्ही प्राशील । दैत्यध्वंस करी ॥११॥

इंद्र कोपता धांवून । उपटील गोवर्धन ।गाईगोपाळा रक्षून । करीन भोजन ॥१२॥

कालींदीतीरी जगदीश । व्रजवनितांशी रास ।खेळुनि मारील कंसास । मुष्टिक चाणुरास ॥१३॥

ऎशी चरित्रे अपार । दावील भूमीवर ।पांडव रक्षील सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥१४॥

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल