शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

International Yoga Day 2023: जागतिक योग दिनासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ जून या तारखेचा प्रस्ताव का मांडला? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 13:56 IST

International Yoga Day 2023: २०१४ पासून जगभर योग दिवस साजरा होऊ लागला आहे, पण याच दिवसाचे प्रयोजन काय? सविस्तर वाचा... 

आरोग्य ही खरी संपत्ती आहे. ही संपत्ती कमावली तर इतर गोष्टीही सहज साध्य करता येतात. योगाभ्यासाचे महत्त्व जनमानसात रुजावे म्हणून पंतप्रधान मोदींनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये एक भाषण केले व त्यात ते म्हणाले, '' "योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे; ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद; विचार, संयम, पूर्तता; आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करावा आणि योग साधनेसंबंधी जनजागृती करावी." 

मोदींनी मांडलेल्या प्रस्तावाला संमती देत ''जागतिक योग दिन'' साजरा करावा असे ठरले, परंतु नेमका कोणता दिवस यावर चर्चा केली असता मोदींनी २१ जून ही तारीख सुचवली. कारण २१ जून हा वर्षातील मोठा दिवस असतो आणि योगाभ्यास दीर्घायुष्य देतो. १ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ​​म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पंतप्रधान मोदींचा हा ठराव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला. सर्वात कमी कालावधीत पूर्ण बहुमताने मंजूर होणारा तो पहिला प्रस्ताव ठरला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला.  (Internation Yoga Day 2023)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांसह सुमारे ३६,००० लोकांनी २१ जून २०१५ रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ३५ मिनिटांसाठी २१ योगासने केली. या समारंभाने गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला गेला. पंतप्रधानांच्या सक्रिय उपस्थितीमुळे योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात लाखो लोकांनी योग दिवस साजरा केला आणि आनंदाची बाब म्हणजे आजही हा दिवस तितक्याच उत्साहाने सर्वत्र साजरा होत आहे!

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनNarendra Modiनरेंद्र मोदीHealthआरोग्य