Inspirational Story: नैराश्याच्या गर्तेतून स्वत:ला बाहेर काढायचे आहे? 'ही' बोधकथा नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 07:00 IST2025-12-11T07:00:01+5:302025-12-11T07:00:02+5:30

Inspirational Story: जिंकण्याची ताकद प्रत्येकात असते, गरज असते ती फक्त मनावर आलेला मळभ, आळस झटकण्याची; ते कसे करायचे? त्यासाठी ही गोष्ट वाचा.

Inspirational Story: Want to get yourself out of the pit of depression? Be sure to read 'this' parable | Inspirational Story: नैराश्याच्या गर्तेतून स्वत:ला बाहेर काढायचे आहे? 'ही' बोधकथा नक्की वाचा

Inspirational Story: नैराश्याच्या गर्तेतून स्वत:ला बाहेर काढायचे आहे? 'ही' बोधकथा नक्की वाचा

आपण सगळेच जण मोटीव्हेशन अर्थात प्रेरणा मिळण्यासाठी दुसर्‍यांकडून ऊर्जा मिळण्याची वाट पाहत राहतो. पण आपण स्वत: स्वयंप्रकाशी आहोत हेच विसरून जातो. जेव्हा इतर कोणी प्रेरणा देण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, धीर देण्यासाठी आसपास नसेल तेव्हा ही बोधकथा आठवा आणि आळस झटकून कामाला लागा. 

वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?

एक राजा असतो. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ, पायदळ, हत्तीदळ असते. तो राजा प्रजेवर तसेच प्राणिमात्रांवरही प्रेम करणारा होता. त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता. तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता. राजाच्या युद्धामध्ये  त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती. मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता. तसे असले तरी राजाने त्याचे पालन पोषण बंद केले नव्हते. तो इतर प्राण्यांप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल ठेवत असे. राजाचे पाहून सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत. 

एक दिवस त्या हत्तीला अंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले. अंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखल गाळात हत्ती रुतून बसला. काही करूनही तो बाहेर येत नव्हता. तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षून चालणार नव्हते. म्ह्णून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढू पाहिले. मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये रुतत चालला होता. माहुत त्याला अंकुश टोचत होता. वेदनेने तो बाहेर येईल अशी त्यांची कल्पना होती. मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले. शेवटी राजाला हकीकत सांगितली. 

Astrology: आयुष्य बदलेल! जाणून घ्या चांदीची अंगठी धारण करण्याचे 'हे' ५ चमत्कारी फायदे!

राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या हत्तीला पाहिले. त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली. थोड्या वेळाने रण वाद्य घेऊन वादक नदीवर जमले. राजाने त्यांना युद्ध प्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले. त्या संगीताचा परिणाम असा की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारले. कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते. तो सगळी शक्ती एकवटून उठला. चिखलातून पाऊल बाहेर काढलं. पाय घसरला. तो जिद्दीने पुढे झाला. स्वतःला पुढे रेटलं. राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली. बादशहाने त्याला गोंजारले. सगळ्यांना आनंद झाला. 

Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 

गोष्टीचे तात्पर्य : बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते, पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही. मात्र ते वाद्य वाजवणारी, आपल्या बद्दल जिव्हाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असे नाही. म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मनात वाजवायचे. जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू. 

Web Title : निराशा से मुक्ति: प्रेरणादायक कहानी, आंतरिक शक्ति खोजें

Web Summary : एक राजा का बूढ़ा हाथी, कीचड़ में फँस गया, युद्ध के नगाड़े सुनकर शक्ति वापस पाता है, हमें याद दिलाता है कि आंतरिक शक्ति मौजूद है; निराशा को दूर करने के लिए हमें इसे स्वयं प्रज्वलित करना चाहिए। जीवन की चुनौतियों से बचने के लिए अपना 'युद्ध नगाड़ा' खोजें।

Web Title : Overcoming Depression: An Inspirational Story to Find Strength Within

Web Summary : A king's aged elephant, stuck in mud, regains strength upon hearing war drums, reminding us that inner strength exists; we must ignite it ourselves to overcome despair. Find your 'war drum' to escape life's challenges.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.