Holi 2022: होलिका दहन करताना 'या' झाडांची लाकडं चुकूनही जाळू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:48 IST2022-03-16T20:48:22+5:302022-03-16T20:48:42+5:30
होळी हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो. दरवर्षी होळीचा सण साजरा करण्यापूर्वी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते.

Holi 2022: होलिका दहन करताना 'या' झाडांची लाकडं चुकूनही जाळू नका!
होळी हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो. दरवर्षी होळीचा सण साजरा करण्यापूर्वी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. यानंतर चैत्र महिन्यातील प्रतिपदेला होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होलिका दहन गुरुवार, १७ मार्च रोजी होणार आहे. 18 मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाणार आहे. होलिका दहनासाठी लाकडाची खूप आधीपासून व्यवस्था केली जाते. परंतु धार्मिक मान्यतेनुसार काही झाडे अशी आहेत, जी हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जातात, या झाडांचे लाकूड होलिका दहनासाठी वापरू नये!
होलिका दहन दरम्यान पिंपळ, वड, शमी, आवळा, कडुनिंब, आंबा, केळी आणि बेल या झाडांची लाकडं कधीही वापरू नयेत. हिंदू धर्मात या झाडांना अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते. त्यांची पूजा केली जाते आणि या वृक्षांच्या लाकडाचा उपयोग यज्ञ, विधी इत्यादी शुभ कार्यासाठी केला जातो. होलिका दहन हे जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या कामात या लाकडांचा वापर करू नये.
या लाकडांचा वापर करा
तुम्हाला हवं असल्यास, होलिका दहनच्या वेळी तुम्ही एरंडच्या झाडाचा वापर करू शकता. अशा परिस्थितीत होलिका दहनासाठी तुम्हाला कोणत्याही हिरव्यागार झाडाचे लाकूड तोडण्याची गरज नाही. होलिका दहनासाठी तुम्ही तण किंवा इतर कोणत्याही झाडाचे सुकलेले लाकूड देखील वापरू शकता. याशिवाय होलिका दहन हे शेणीनेही करता येते.
होलिका दहनाच्या मागे भक्त प्रल्हादांच्या भक्तीची कथा दडलेली आहे, ज्याला वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिले जाते. दैत्य राजा हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता, पण हिरण्यकशिपूला ते आवडले नाही. त्याला आपल्या मुलाला नारायणाच्या भक्तीपासून दूर ठेवायचे होते, परंतु प्रल्हाद हे मान्य नव्हते. यानंतर हिरण्यकशिपूने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तो अयशस्वी झाला. यानंतर त्याने हे काम आपली बहीण होलिका हिच्याकडे सोपवले जिला वरदान होते की अग्नी तिचं शरीर जाळू शकत नाही. प्रल्हादला मारण्याच्या उद्देशाने होलिका अग्नीत बसली, पण स्वतः जळून राख झाली, पण प्रल्हादचे काहीही बिघडले नाही. तो वाईटाचा अंत आणि भक्तीचा विजय मानला जात असे. ज्या दिवशी होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली होती, त्या दिवशी पौर्णिमा होती. तेव्हापासून होलिका दहन दरवर्षी पौर्णिमेला केले जाते.