शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
3
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
4
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
5
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
6
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
7
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Holi 2021 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 22, 2021 1:51 PM

Holi 2021 : फाल्गुन पौर्णिमेला भद्रा नक्षत्र संपल्यानंतर होळी पेटवावी. मात्र दिवसा कधीही होळी पेटवू नये. होळी शक्यतो गावामध्ये किंवा गावाबाहेर सार्वजनिक स्वरूपात पेटवण्याची प्रथा आहे. 

भक्त प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण  होलिका हिला अग्नीपासून अभय होते. त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वत:च्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्याभोवती लाकडे रचून आग लावण्यात आली. मात्र झाले उलटेच! भगवान श्रीविष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका राक्षसी मात्र जळून खाक झाली. त्या प्रित्यर्थ होलिकादहन विधी करण्याची प्रथा पडली. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा! म्हणून आजही फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन केले जाते. 

यंदा फाल्गुन पौर्णिमा शनिवार, २७ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून, रविवार, २८ मार्च २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून १८ मिनिटांनी फाल्गुल पौर्णिमा समाप्त होईल. भारतीय परंपरेत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच होळीचा सणाच्या दिवशी रात्री होलिकादहन केले जात असल्यामुळे रविवार, २८ मार्च २०२१ रोजी हा सण साजरा केला जाईल. 

फाल्गुन पौर्णिमेला भद्रा नक्षत्र संपल्यानंतर होळी पेटवावी. मात्र दिवसा कधीही होळी पेटवू नये. होळी शक्यतो गावामध्ये किंवा गावाबाहेर सार्वजनिक स्वरूपात पेटवण्याची प्रथा आहे. 

ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल, ती जागा सकाळीच केर काढून पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्य फांद्या, काटक्या, गोवऱ्या ह्यांची ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे, त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो. 

पूजा करणाऱ्या व्यक्तीने देश, कालाचा उच्चार करून 'ढुंढा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांच्या परिहारार्थ या होलिकेचे पूजन मी करत आहे' असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीची षोडशोपचारे पूजा करावी. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर ती होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात, तर काही ठिकाणी पेटवून झाल्यानंतर करतात. परंतु होळी प्रदिप्त करण्यापूर्वी पूजा करणे सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरते. 

होळी पेटवल्यानतर तिला सर्वांनी तीन प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करून अर्घ्य द्यावे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. श्रीफळ वहावे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. हा धूलिवंदनाचा सण मुळात चार दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. होळीपासून पाचव्या दिवसाला म्हणजेच फाल्गुन कृष्ण पंचमीला 'रंगपंचमी' म्हणतात. ती प्रामुख्याने मथुरा, द्वारका अशा कृष्णाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या स्थळी शास्त्रोक्त पद्धतीने खेळली जाते.

टॅग्स :Holiहोळी