शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Jayanti 2026: हनुमानाचा जन्म पहाटेचा; देवदर्शनाला 'या' ३ गोष्टी वाहिल्याशिवाय दर्शन अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:31 IST

Hanuman Jayanti 2026: २ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे, त्यादिवशी पहाटे हनुमान मंदिरात जा आणि सोबत 'या' तीन वस्तू आठवणीने न्या. 

२ एप्रिल रोजी हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2026) अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे. या दिवशी हनुमंताला तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते, तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो. अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते. भजन, कीर्तन असते. जन्मवेळ अर्थात सूर्योदयाची वेळ ६.४० झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते. तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील ३ गोष्टी आठवणीने घेऊन जा, त्याचे कारणही  जाणून घ्या. 

चैत्र पौर्णिमा २०२६: हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा; १० सेकंदात मिळवा संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं पुण्य!

या दिवशी तसेच हनुमंताचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याला प्रिय असे तीन पदार्थ अर्पण केले जातात. रुई, तेल आणि शेंदूर! या तीन गोष्टी आवडण्यामागचे कारण काय असेल, जाणून घेऊया.

तेल : दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात. त्या संबंधी अशी एक कथा आहे, की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तिमुळे लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्राणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्त्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रुढी पडली. 

रुई : हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. ती थोडक्यात अशी-हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी, इतकेच नव्हे, तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या विंâवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली. 

Numerology: तुमच्या मुलांकात दडलंय हनुमानासारखं बळ; करिअर आणि आयुष्यात यश मिळवण्याचं 'हे' आहे गुपित!

शेंदूर : हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे-सीतामाईला भाळी कुंकुम शेंदुर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि `माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय?' असे हनुमंताने सीतामाईला विचारले.'असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल' असे सीतामाईने हनुमानाला सांगितले, तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला. 

अहिरावण-महिरावण नामक दोन मायावी राक्षसांनी रामलक्ष्मणांना कपटाने पाताळनगरीत नेले. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐन वेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली. या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात-

पाताळ देवता हंता, भव्यसिंदुर लेपना! 

Hanuman Jayanti 2026: महिलांनो, हनुमान जयंतीला चुकूनही करू नका 'या' गोष्टी! जाणून घ्या पूजेचे योग्य नियम

याची स्मृती म्हणून हनुमानाला शेंदुर लावण्याची प्रथा पडली.  बजरंग बली की जय!

English
हिंदी सारांश
Web Title : Hanuman Jayanti 2026: Significance of offerings and Hanuman's birth story.

Web Summary : Hanuman Jayanti celebrates Hanuman's birth. Devotees offer oil,rui leaves, and sindoor, each with symbolic meaning rooted in legends of healing, devotion, and protection. The article explains reasons behind these offerings.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Hanumanहनुमान