Gurupushyamrut Yoga 2023: आज वर्षाअखेरीस आलेल्या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ कसा करून घ्यायला हवा ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 11:39 IST2023-12-28T11:39:05+5:302023-12-28T11:39:54+5:30
Gurupushyamrut Yoga 2023: २८ डिसेंबर रोजी उत्तर रात्री सुरू होणारा गुरु पुष्यामृत नवीन वर्षाची नांदी करून देणारा ठरेल, त्यासाठी काय करायला हवे ते पहा!

Gurupushyamrut Yoga 2023: आज वर्षाअखेरीस आलेल्या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ कसा करून घ्यायला हवा ते जाणून घ्या!
गुरु पुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावर शुभ कार्य केली जात नाहीत परंतु शुभ गोष्टींचा शुभारंभ निश्चितच केला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदी केली असता धनसंपत्तीत वाढ होते. या दृष्टीने हा सुवर्ण योग महत्त्वाचा आहेच, शिवाय या निमित्ताने आणखी काय केले जाते तेही जाणून घेऊ!
गुरु पुष्यामृत मुहूर्त:
गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. आज वर्षाअखेरीच्या मुहूर्तावर म्हणजेच २८ डिसेंबर रोजी उत्तर रात्री १ वाजून ३ मिनिटांनी सुरू होऊन २९ डिसेंबर रोजी सकाळी ७. १२ पर्यंत हा योग जुळून आला आहे. गुरुवार दत्तगुरूंचा त्यातही तो मार्गशीर्षातला आणि गुरुपुष्यामृत योग माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा, त्यामुळे हा योग सहा राशींसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे.
गुरु पुष्यामृत योगावर काय करतात?
गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक, खरेदी, नवीन व्यवसायाची सुरूवात, विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते. हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे. मात्र या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण, तसेच इतर सर्व धार्मिक /अध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो. या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येईल. तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल.
पुष्यामृत (Guru Pushyamrut 2023) गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्ती चा आशीर्वाद देणारे आहेत, पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच म्हत्ववाचे आहे. म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी. घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते.
गुरुपुष्यामृत (Guru Pushyamrut 2023) हा मुहूर्त शुभ असला, तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो. कारण, गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्त गुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल? म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगलकार्य टाळावे. मात्र इतर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही!