शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:04 IST

Guru Purnima 2025 Information: कोणत्याही गोष्टीत सातत्य असल्याशिवाय फळ मिळत नाही, गुरुपौर्णिमेला २१ दिवस बाकी असल्याने दिलेली उपासना करा, स्वामीकृपेची प्रचिती घ्या!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

जुलै च्या १० तारखेला गुरु पौर्णिमा(Guru Purnima 2025) आहे. २० जून पासून उपासनेला सुरवात केली तर १० जुलैला २१ दिवसाच्या उपासनेची करता येयील . प्रत्येक क्षणी महाराज आपल्या सोबत असतात, दिसत नाहीत कारण तितकी आपली कुवत नाही, पण ते असतात . आपल्याला दुःख झाले की त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येतात. आपल्या लाडक्या भक्तांना काहीही कमी पडू देत नाहीत. खडतर तपस्या करून घेतील, परीक्षा घेतील पण एक दिवस इतके भरभरून देतात की त्यांच्यावर असलेलेसगळे रुसवे फुगवे आपण विसरून जातो. 

गुरु पौर्णिमा हा आपल्या भक्तांसाठी महाराजांच्या चरणाशी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस, कृतकृत्य होण्याचा आणि गुरूंच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस. आपले नित्य कर्म सोडून जप करत राहिलो तर महाराजांना ते आवडणार नाही. कारण श्रावणी सोमवारची खुलभर दुधाची गोष्ट... येतंय ना लक्षात?

प्रत्येक दिवस ही एक पायरी आहे . अशा २१ पायर्यांची साधना आपल्याला महाराजंच्या समीप नेणार ह्यात शंका नको. आत्मिक समाधान आणि गुरुप्रती निष्ठा, समर्पण ह्याचा हा त्रिवेणी संगम आहे. आपली नित्याची दिनचर्या सांभाळून खालीलपैकी कुठलीही एक साधना करून आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया. प्रत्येक पायरीवर महाराज काही न काहीतरी बोध करून देतील, आत्मपरीक्षण करताना आपल्यातील चुकांना आरसा दाखवतील. आपल्याला कुठे कुठे सुधारायला वाव आहे ते समजेल. प्रत्येक पायरी अनमोल आहे. आपल्याच आयुष्याचा लेख जोखा आपल्यासमोर उलगडेल. सतत दुसऱ्यांचे दोष काढणारे आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होवू. २१ व्या पायरीवर मन आणि चित्त दोघांचेही शुद्धीकरण होईल आणि महाराज काय चीज आहे ते अंशतः तरी समजेल. 

>> अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण >> श्री स्वामी कृपा तारक मंत्र ( रोज ११, २१, ५१, १०८ जमेल तसा )>> श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण >> श्री आनंदनाथ महाराज ह्यांचे श्री गुरुस्तवन स्तोत्र पठण>> दत्त बावन्नी >> मानसपूजा >> स्वामी महाराजाच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक आरती नेवेद्य

वरील पैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना २१ दिवस संकल्प करून करू शकतो. त्याचसोबत रोज अन्नदान करू शकतो. ह्या सर्वाचा उपयोग म्हणजे, आपल्या स्वतः मध्ये पुढील २१ दिवसात होत जाणारा बदल. प्रपंचातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळत जातात. प्रचीती माणसाला जगायची उमेद देते आणि महाराजांच्या ठायी विश्वास द्विगुणीत करते . प्रचीतीविना भक्ती नाही आणि महाराज आपल्या भक्तांना प्रचीती दिल्याशिवाय कसे राहतील? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त तेच शक्य करू शकतात. गुरुपौर्णिमा, प्रगट दिन ही तर फक्त निम्मित्त आहेत, आपण ह्या दिवसांची वाट न पाहता अगदी ह्या क्षणापासून साधनेला सुरवात केली पाहिजे. आपल्यातील उत्तम माणूस, भक्त घडवण्याचे काम आपण केलेली साधना करत असते. साधनेतून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो, त्याला गुरु चरणांच्या शिवाय काहीही दिसत नाही. साधनेच्या ह्या काळात अनेक दिव्य चमत्कार होतात, आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते. साधनेचा काळ हा आत्मपरीक्षणाचा असतो. आपल्या आतमध्ये अंतर्मनात डोकावून अनुभूती घेण्याचा असतो. मनाची सात्विकता, शांतपणा, संयम, विचार करण्याची क्षमता, मनन चिंतन सर्वकाही ह्या काळात होत जाते आणि त्यातून एक साधक तयार होतो. लहान सहान गोष्टीत न अडकता आपले जीवन गुरु चरणांशी समर्पित करता आले पाहिजे हेच साधना शिकवते. भौतिक सुखे पायाशी हात जोडून उभी असताना झोपेच्या गोळ्या न घेता झोप येत नसेल तर त्या भौतिक गोष्टी किती निरर्थक आहेत आणि अशाच सर्व गोष्टींच्या मागे आपण आयुष्यभर लागून आपली मनशांती मात्र घालवून बसतो. मनाची शांतता , मनाचा समतोल पुन्हा मिळवण्यासाठी ह्या २१ पायऱ्या २१ दिवसात चढताना दिव्य अनुभव येतात. आपलीच आपल्याला नव्याने ओळख होत जाते. आयुष्यभर दुसऱ्यांचे गुण अवगुण शोधणाऱ्या आपल्याला आपल्यातील असंख अवगुणाची ओळख होते . मन स्वीकारते पण अंतर्मन नाही, अशा सर्व गोष्टी आरशासारख्या स्वच्छ होतात. आपल्यातील आणि महाराजांच्यामधील आपल्या अहंकाराची भिंत जणू कोसळून पडते. महाराजांचे अस्तित्व सहवास प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे भक्त किती किती भाग्यवान असतील. डोळे मिटले तरी अक्कलकोट शेगाव समोर उभे राहते तेव्हा तो क्षण आपण महाराजांच्या खूप समीप असतो. 

स्वामी म्हणजे स्वाः मी...ह्या साधनेतून आपण आपल्यातील मी ला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजली देण्याचा प्रयत्न करुया . महाराजांच्या नावातच आणि त्यांच्या चरणाशी आपले जग आहे बाकी सबकुछ फोल आहे, अर्थहीन आहे ह्याची जाणीव करून देणारी साधना आपल्याला कात टाकल्यासारखे नवीन जीवन देईल ह्यात दुमत नसावे. तुम्हा आम्हा सर्वाना करत असलेल्या साधनेतून आनंद मिळूदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना . 

संपर्क : 8104639230

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाshree swami samarthश्री स्वामी समर्थIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधी