शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

Guru Purnima 2021 : लोकमान्य टिळक यांना राष्ट्रगुरु का म्हटले जात असे, त्यामागे आहेत 'ही' कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:06 IST

Guru purnima 2021 : जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला.

गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवतो, तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरु असे यथार्थतेने म्हणता येते. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला. त्यांच्याबद्दल अधिक माहिती देताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात-

अलीकडच्या इतिहासात गेल्या शे दीडशे वर्षांत लोकमान्यांएवढी लोकप्रियता आणि लोकमान्यता दुसऱ्या कोणाला मिळालेली नाही. लोकमान्यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय स्वच्छ व निष्कल असे होते. लोकमान्य हे जणू परमेश्वराचा अवतार आहेत, अशा भावनेने लोक त्यांच्याकडे पाहत असत. लोकमान्य तुरुंगात गेले तर त्यांच्यामुळे तुरुंग पावन झाला असे एका कवीने म्हटले आहे.

लोकी निंद्य कारावास, परि तू पावन केले त्यास।।

रँडच्या खुनासंदर्भात टिळकांना शिक्षा झाली. प्रथम काही महिने टिळक डोंगरीच्या तुरुंगात होते. तिथे तळहाताएवढ्या भाकरीचा तुकडा ते पाण्यात कुस्करून खात. दोन महिन्यांत त्यांचे वजन तीस पौंडांनी कमी झाले. टिळक तुरुंगात असताना कोट्यावधी भारतीयांना जेवण गोड लागत नसे. लोकमान्य तुरुंगात आहेत म्हणून लोकमान्यांचे गुरू श्रीधर गणेश जिनसीवाले हे इतके व्यथित झाले, की ते चौपाटीवर जाऊन लहान मुलासारखे रडत बसले. लोकमान्यांना तुरुंगात अतिशय वाईट भोजन मिळते, हे समजल्यावर कैद्यांना घरुन जेवण आणायची मुभा होती ते आपल्या डब्यातून लोकमान्यांना आवडणारे पदार्थ मागवीत आणि युक्तीने ते त्यांच्यापर्यंत पोहोचवित. 

येरवड्याच्या तुरुंगात टिळक असताना तेथील शिपाई टिळकांना आवडती सुपारी त्यांना देण्यात आनंद मानत असे. काही समाजकंटक लोकमान्यांना हिणवण्यासाठी तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणत असत. परंतु समाजाच्या या वर्गाचा लोकमान्यांवर अतिशय लोभ होता. 

टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले त्यावेळी पुण्यातील काही देवळांमध्ये चक्की दीपोत्सव साजरा झाला. सरदार खाजगीवाल्यांनी टिळक सुटून येईपर्यंत गणपतीचे विसर्जन करणार नाही असा पण केला होता. टिळक सुटून आल्यावर थाटामाटात विसर्जन करण्यात आले.

१८९८ च्या प्रारंभी मुबईला प्लेगची साथ होती. प्लेग प्रतिबंध लस विश्वासार्ह न वाटल्याने टिळक ती लस टोचून घेण्यास नाखुष होते. त्यामुळे तुरुंगातील इतर कैदीही लस टोचून घ्यायला तयार होईना. मग डॉक्टरांनी टिळकांना सांगितले, `तुम्ही लस टोचून घ्या  तरच इतर लोक लस घेतील.' टिळकांची खात्री पटल्यावर त्यांनी अणि इतर कैद्यांनी लस टोचून घेतली. 

टिळक तुरुंगातून सुटून येईपर्यांत लोकांनी अनेक उपासतापास केले, नवस केले, आवडते पदार्थ सोडले. अनुष्ठाने केली. टिळक राष्ट्राचे पुढारी होते, पण प्रत्येकला ते आपल्या घरचेच कोणी वडीलधारे आहेत, असे वाटे. टिळकांसारखा लोकोत्तर आदर्श पुढारी अद्वितीय स्थान प्रस्थापित करणारे टिळक या देशाला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे राष्ट्रगुरु म्हणून पुजनीय वाटतात.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाLokmanya Tilakलोकमान्य टिळक