Gudi Padwa 2024: हिंदू नववर्षाची सुरुवात 'या' प्रार्थनेने करूया; ज्याचा लाभ संपूर्ण विश्वाला होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:17 AM2024-04-09T11:17:20+5:302024-04-09T11:18:12+5:30

Gudi Padwa 2024: नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा एकदोघांनाच नाही तर अखिल विश्वाला देऊया, पुढील श्लोकातून!

Gudi Padwa 2024: Let's start the Hindu New Year with 'this' Prayer; Which will benefit the whole world! | Gudi Padwa 2024: हिंदू नववर्षाची सुरुवात 'या' प्रार्थनेने करूया; ज्याचा लाभ संपूर्ण विश्वाला होईल!

Gudi Padwa 2024: हिंदू नववर्षाची सुरुवात 'या' प्रार्थनेने करूया; ज्याचा लाभ संपूर्ण विश्वाला होईल!

आज गुढीपाडवा. आजपासून हिंदू नवीन वर्षाचा आरंभ होत आहे. या निमित्ताने 'सर्वेपि सुखिनः संतु' हा विचार बाळगून आपणही देवाकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना सर्वांना मुखोद्गत असेलच, ती प्रार्थना म्हणजे मंत्रपुष्पांजली. गणेशोत्सवात आरती संपल्यावर कानावर पडून पडून पाठ झालेली मंत्रपुष्पांजली हा आपल्या थोर ऋषीमुनींनी लिहिलेला सिद्धमंत्र आहे. त्याचे नीट उच्चारण केले आणि श्रद्धापूर्वक ते नित्यनेमाने म्हटले, तर अखिल विश्वाचा उद्धार करण्याची ताकद त्या मंत्रात आहे. त्यात केवळ आपल्या राज्याचा, जिल्ह्याचा, देशाच्या सुख समृद्धीचा विचार केलेला नाही, तर अखिल विश्वाच्या शांततेसाठी प्रार्थना केली आहे. चला तर, आजच्या शुभ मुहूर्तावर एक मुखाने एक दिलाने आपणही अर्थ समजून घेत मंत्र पुष्पांजली म्हणूया....

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|
ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:
ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|
कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति
एकदंतायविद्महे वक्रंतुडाय धीमहि
तन्नोदंती प्रचोदयात्
श्रीशुभं भवतु

मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् 
तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देवा:

अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। 
मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। 
स मे कामान् कामाकामाय मह्यं। 
कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः।

अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.

ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। 
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।

अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। 
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।

अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना. 

Web Title: Gudi Padwa 2024: Let's start the Hindu New Year with 'this' Prayer; Which will benefit the whole world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.