Gudi Padwa 2024: सायंकाळी गुढी उतरवल्यावर कढीलिंबाचा पाला फेकू नका, त्याचा 'असा वापर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 07:00 AM2024-04-09T07:00:00+5:302024-04-09T07:00:02+5:30

Gudi Padwa 2024: आज चैत्र शुद्ध प्रतिपदेला घरोघरी गुढी उभारून नवंवर्षाचे स्वागत केले जाईल, तिला जोडलेला पाला तुम्हाला निरोगी आयुष्य देईल! 

Gudi Padwa 2024: Don't throw away the neem leaf after taking down the Gudi in the evening, use it as it is! | Gudi Padwa 2024: सायंकाळी गुढी उतरवल्यावर कढीलिंबाचा पाला फेकू नका, त्याचा 'असा वापर करा!

Gudi Padwa 2024: सायंकाळी गुढी उतरवल्यावर कढीलिंबाचा पाला फेकू नका, त्याचा 'असा वापर करा!

गुढीचा नैवेद्य आयुर्वेदाचार्य सुश्रुताने “चरक संहितेत” सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक औषध म्हणून कडू लिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, साखर, मिरे, जिरे, हरभऱ्याची डाळ, ओवा, हिंग, धने, मीठ यांचे मिश्रण वाटून एकजीव करून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद खायला देतात, यासाठी की जरी आयुष्याची किंवा दिवसाची, वर्षाची सुरुवात कडू झाली तरी शेवट गोड व्हावा" हा संदेश यातून मिळतो.

खरे तर हे चूर्ण रोज चमचाभर आयुष्यभर घ्यायचे असते. ज्यामुळे दुर्धर व्याधी दूर होतात. शरीर तेजस्वी व निरोगी बनते. तो तिक्त रस आहे जो शरीराला अत्यावश्यक आहे. तो शीत आहे, चन्दनाच्या खालोखाल त्याचे गंध उगाळून सर्वांगाला लावतात, म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते. किवा आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकूनही स्नानाला म्हणजे शरीर निरोगी वापरतात. म्हणून लिंबाच्या पेंडीचा निम साबण वापरतात. बाळंतिणीने ह्याचा रस प्यायल्यास बाळंतरोग होत नाहीत.

कडू घोट जीवनात अनेकदा येतात ते गिळून टाकण्याची सवय व्हावी.  म्हणून म्हणतात की व्यवहारात नेहेमी कटू असावे म्हणजे शेवट गोड होतोच. अन नेमके तेच आपल्याला नको असते किंवा आवडत नाही व आपण ते टाळतोच, जे नेहेमी अटळ असते. जे नको असते तेच आपल्या नशिबी येते. मग जे मिळाले तेच गोड का न मानून घ्यावे! औषध कडुच असते पण ते कसे शर्करावगुंठित असते पण ते आपले आरोग्य चांगले ठेवते ना! तसेच आपले आयुष्य असते. 

कडुच का? जे वर्षभर सेवन केले जात नाही ते वर्षारंभीच का? हा एक पर्यावरणाचा संदेश आहे. झाडे लावा झाडे जगवा. लिंब हे ऑक्सीजन पुरवणारे झाड आहे. त्याची पाने हवा शुद्ध करतात. पूर्वी हायवेवर, किंवा गावांच्या दुतर्फा ही दोन दोन माणसांच्या हाताचा मोठ्ठा घेर असलेली लिंब, चिंच, आंबा, वड, पिंपळ, साग, पळस, औदुंबरही झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाई. त्याचे कारण म्हणजे हे वृक्ष थंडगार सावली व लाकूडफाटा, सरण, बांधकामासाठी लाकूड, पाचोळ्याचे खत, फळे फुले, पाने सर्वच औषधी व पशुपक्षी, मानवास खाण्यास उपयोगी, जणू कल्पवृक्षच.

पण आता तुमच्या लक्षात आले आहे का, की इथेही पाश्चिमात्य विचारांनी घुसखोरी करून आपली नकळत सांस्कृतिक व पर्यावरणाची हानी सुप्तपणे चालवली आहे, हे वृक्ष लावणे बंदच झाले आहे काही काळापासून व सुभाबुळ, गुलमोहोर, विदेशी भरपूर कचरा करणारी, फळेफुले न देणारी अशी नाजुक झाडे लावण्याचा सपाटा चालू आहे(ज्याच्या लाकडाचा काहीही उपयोग होत नाही), दुर्दैवाने हे कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. असो. आपण त्याचे महत्त्व लक्षात घेऊ आणि पर्यावरण पूरक झाडांची लागवड करून निसर्गाचे आणि संस्कृतीचे जतन करू. 

Web Title: Gudi Padwa 2024: Don't throw away the neem leaf after taking down the Gudi in the evening, use it as it is!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.