शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:29 IST

Navratri 2025: नवरात्रीत स्थापन केलेल्या घटाचे विसर्जन नवमीला करावे की दशमीला? गोंधळू नका, वाचा ही शास्त्रोक्त माहिती!

नवरात्रीचे(Navratri 2025) ९ दिवस आनंदात, उत्साहात, चैतन्यमयी साजरे झाले. कुठे गरबा तर कुठे भोंडल्याचा खेळ रंगला. देवीची गाणी, जोगवा, परडी भरून भक्तांनी आईपाशी कृतज्ञता व्यक्त केली. तिचे दर्शन घेऊन ओटी भरली आणि त्याबरोबरच घटस्थापनेला घट बसवून नऊ दिवस झेंडूच्या माळा अर्पण करून अखंड नंदादीप तेवत ठेवला. एवढी सगळी पूजा बांधल्यावर त्याचे विसर्जनही शास्त्रशुद्ध पद्धतीनेच व्हायला हवे ना? याबाबत शेखर क्षीरसागर गुरुजी यांनी दिलेली विधिवत माहिती आणि विसर्जनाची तिथी जाणून घेऊ. 

Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

नवरात्रीचा घट विसर्जनाचा मुहूर्त : 

यंदा नवरात्रीत तिथी विभागून न आल्यामुळे पूर्ण दहा दिवसाचा उत्सव साजरा करता आला. मात्र त्यामुळे गोंधळ कमी व्हायचा सोडून वाढला आहे, असे लक्षात आले. घटाचे विसर्जन कधी असा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार विचारला जाऊ लागला. त्यावर उत्तर हेच, की घटाचे उत्थापन अर्थात विसर्जन दसऱ्यालाच करायचे आहे. मात्र काही लोकांकडे कुलाचार म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीला घट विसर्जित करण्याची प्रथा आहे. तसे असेल तर घरचा कुलधर्म करा आणि तसा नियम नसेल तर शास्त्रानुसार दसऱ्याला सकाळी घट विसर्जित करा. 

रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते, असे त्यामागचे कारण आहे. 

Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!

घट विसर्जनाचा विधी : 

>> नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी. 

>> नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी. टाक ताम्हनात घेऊन अभिषेक करावा. 

>> धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी. 

>> जेवणाचा नैवेद्य दाखवून, पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करावी. 

>> पुरणाचे दिवे नऊ, पाच, सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा. 

>> सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी, मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा. पुरणाची आरती करावी.

>> कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे. 

>> दाराला आंब्याचे तोरण लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे. 

October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!

देवीची आरती : 

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥साही विवाद करितां पडिले प्रवाही ।ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

English
हिंदी सारांश
Web Title : Navratri Ghat Visarjan 2025: Rituals for prosperity and divine grace.

Web Summary : Celebrate Navratri's end with proper Ghat Visarjan on Dussehra or Navami according to tradition. The ritual includes worshiping the goddess, performing aarti with Puran divas, sprinkling kalash water, and decorating the entrance for blessings.
टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLaxmi Pujanलक्ष्मीपूजनNavratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५