Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:13 IST2026-04-13T16:12:23+5:302026-04-13T16:13:51+5:30

Garud Puran: मृत्यू हे अटळ सत्य आहे, परंतु गरुड पुराण सांगते की यमदूत येण्यापूर्वी माणसाला सावध करण्यासाठी काही चिन्हे दिसू लागतात.

Garud Puran: According to Garud Puran, 'these' mysterious signs are received before death; What exactly happens in the final moments? | Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?

Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?

गरुड पुराण हा हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. यामध्ये केवळ मृत्यूनंतरच्या प्रवासाचेच नाही, तर मृत्यू जवळ आल्यावर मानवी शरीरात आणि आयुष्यात कोणते बदल घडतात, याचेही सखोल वर्णन केले आहे. गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ जवळ येतो, तेव्हा निसर्ग आणि शरीर त्याला काही विशिष्ट संकेत देऊ लागतात. कोणते ते जाणून घेऊ.

हे ही वाचा : Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!

१. स्वतःची सावली न दिसणे (Loss of Shadow)

गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अगदी जवळ असतो (काही तासांवर किंवा दिवसांवर), तेव्हा त्या व्यक्तीला तेल, तूप, पाणी किंवा आरशात स्वतःचे प्रतिबिंब अस्पष्ट दिसू लागते. इतकेच नाही तर सूर्यप्रकाशात उभे असतानाही स्वतःची सावली अस्पष्ट दिसते किंवा पूर्णपणे नाहीशी होते.

२. नाकाचे टोक न दिसणे (Inability to see nose tip)

असे मानले जाते की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाची दृष्टी क्षीण होऊ लागते. जेव्हा एखादी व्यक्ती आपले दोन्ही डोळे नाकाच्या टोकावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करते आणि तिला ते दिसत नाही, म्हणजेच जवळच्या गोष्टीही धूसर होऊ लागतात, तेव्हा असे मानले जाते की त्या व्यक्तीचा काळ जवळ आला आहे. 

३. ध्रुव तारा न दिसणे (Inability to see Pole Star)

रात्रीच्या वेळी आकाशात ध्रुव तारा पाहणे शुभ मानले जाते. परंतु, गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीचा मृत्यू ६ महिन्यांच्या आत होणार असतो, तिला आकाशातील ध्रुव तारा, सूर्य किंवा चंद्र अस्पष्ट किंवा तुटलेल्या अवस्थेत दिसू लागतात.

हे ही वाचा: Vastu Shastra: कुटुंबियांना रक्ताचे विकार आणि हृदयाचे आजार? घराची दक्षिण दिशा एकदा तपासून पाहा

४. शारीरिक बदल आणि इंद्रियांवरचा ताबा सुटणे

मृत्यूपूर्वी माणसाची जीभ जड होऊ लागते, ज्यामुळे त्याला बोलताना त्रास होतो. तसेच, तोंडाची चव पूर्णपणे निघून जाते आणि माणसाला अन्नाचा गंध किंवा चव समजेनाशी होते. शरीराचा रंग अचानक फिकट पिवळा किंवा पांढरट होऊ लागतो. 

५. पूर्वजांचे आणि यमदूतांचे दर्शन

गरुड पुराणानुसार, मृत्यूच्या काही दिवस आधी व्यक्तीला स्वप्नात त्याचे मृत पूर्वज दिसू लागतात. काही वेळा त्या व्यक्तीला आपल्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा भास होतो. पाप आणि पुण्याच्या कर्मांनुसार, काही लोकांना यमदूत दिसू लागतात, ज्यामुळे ते घाबरून ओरडू लागतात.

६. हातातील रेषा पुसट होणे

समुद्र शास्त्र आणि गरुड पुराणाच्या संदर्भांनुसार, जेव्हा काळ जवळ येतो तेव्हा हातावरील भाग्योदय आणि आयुष्याच्या रेषा अत्यंत पुसट किंवा गायब होऊ लागतात.

हे ही वाचा : Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!

मृत्यूच्या संकेतांमागील आध्यात्मिक दृष्टिकोन

हे संकेत देण्यामागचा उद्देश माणसाला घाबरवणे हा नसून, त्याला त्याच्या आयुष्यातील उरलेला वेळ ईश्वराच्या भक्तीत आणि सत्कर्मात घालवण्याची संधी देणे हा आहे. जेणेकरून त्याचा पुढचा प्रवास सुसह्य होईल.

( टीप: सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून अधिक महितीसाठी तज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरेल! )

Web Title : गरुड़ पुराण: मृत्यु से पहले रहस्यमय संकेत, अंत में क्या होता है?

Web Summary : गरुड़ पुराण में मृत्यु के आसन्न संकेतों का विवरण है: छाया का गायब होना, धुंधली दृष्टि, बदली हुई इंद्रियां और दर्शन। ये संकेत शांतिपूर्ण परलोक के लिए भक्ति और अच्छे कर्मों का आग्रह करते हैं।

Web Title : Garud Puran: Mysterious signs before death, what happens in the end?

Web Summary : Garud Puran details signs of impending death: loss of shadow, blurred vision, altered senses, and visions. These signs urge devotion and good deeds for a peaceful afterlife.