गणपती बाप्पाच्या 'या' मंत्राचा रोज १०८ वेळा तरी जप करा; नोकरीचा मार्ग होईल सुकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:41 IST2021-03-17T18:40:26+5:302021-03-17T18:41:30+5:30

मंत्र पठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनेमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्रजप करावा असे सांगितले जाते. 

Ganesh Mantra will give you hopes and power for job search | गणपती बाप्पाच्या 'या' मंत्राचा रोज १०८ वेळा तरी जप करा; नोकरीचा मार्ग होईल सुकर

गणपती बाप्पाच्या 'या' मंत्राचा रोज १०८ वेळा तरी जप करा; नोकरीचा मार्ग होईल सुकर

आपल्या देशात आधीच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न होता, त्यात कोव्हीड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोणी रंकाचा राव झाला तर कोणी रावाचा रंक! तरीदेखील प्रत्येकाचे जगण्याचे युद्ध सुरूच आहे. रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाला अध्यात्मिक शक्तीचे पाठबळ मिळावे, म्हणून आज विनायकी चतुर्थीच्या मुहूर्तावर 'ॐ गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाः' या गणेश मंत्राचा जप सुरू करा. 

  • रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर शांतचित्ताने बाप्पासमोर बसून मन एकाग्र करा. 
  • बाप्पाला गंध लावून आणि फुल वाहून जपाला सुरुवात करा. 
  • हा मंत्र रोज १००८ वेळा म्हणणे अपेक्षित आहे. परंतु वेळे अभावी ते शक्य नसेल तर किमान १०८ वेळा हा मंत्र जरूर म्हणावा. 
  • मंत्र पठण झाल्यावर देवाला आपला मनोदय सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी. 
  • मंत्र पठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनेमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्रजप करावा असे सांगितले जाते. 
     

Web Title: Ganesh Mantra will give you hopes and power for job search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.