बेडरुममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; वास्तूशी निगडीत ५ चुकांचे होतात वाईट परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 20:02 IST2022-03-26T20:00:48+5:302022-03-26T20:02:13+5:30
वास्तूनुसार घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. घर बांधताना वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यास वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं

बेडरुममध्ये चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; वास्तूशी निगडीत ५ चुकांचे होतात वाईट परिणाम
वास्तूनुसार घराची दिशा आणि त्याची रचना यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. घर बांधताना वास्तुशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यास वाईट परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, असे ज्योतिषी सांगतात. त्यामुळे स्वयंपाकघर, बाथरूमपासून मुख्य दरवाजापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वास्तूचे नियम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक मानलं जातं.
काळ्या रंगाची नेमप्लेट लावू नये
घराच्या मुख्य दरवाजातून घरात सुख आणि समस्या दोन्ही येतात. त्याची योग्य व्यवस्था केली तरच घरात सुख-समृद्धी येऊ शकते. त्यामुळे दरवाजा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा. येथे पुरेशी प्रकाश व्यवस्था करा. नेम प्लेट जरूर लावा. नेमप्लेटचा रंग काळा नसावा. शनिवारी मुख्य गेटवर दिवा लावणे विशेषतः शुभ असते.
चप्पल ठेवू नका
घरातील बेडरुम हे स्थान कनेक्शन आणि आनंदाशी संबंधित आहे. यात सुधारणा करून जीवनातील नैराश्य आणि तणाव दूर होऊ शकतो. इथं थोडीशी सुगंधाची व्यवस्था असावी. भरपूर फुलं किंवा फुलांची चित्रं लावू शकता. शूज आणि चप्पल बेडरुममध्ये ठेवू नयेत.
पसारा नको
घरातील लोकांचं आरोग्य घरातील वातावरणाशी संबंधित असतं. स्वयंपाकघरात सूर्यप्रकाश आला तर ते खूप चांगलं होईल. स्वयंपाकघरात गोष्टी व्यवस्थित ठेवा. तसेच पूजा केल्यानंतर स्वयंपाकघरातही उदबत्त्या अवश्य दाखवाव्यात.
बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नका
बेडरुमचं स्थान सुख आणि समृद्धीशी संबंधित आहे. बेडरूमच्या भिंतींचा रंग हलका असावा. फिकट हिरवा किंवा गुलाबी रंग सर्वोत्तम असेल. बेडरूममध्ये टीव्ही लावू नका. इच्छा असल्यास आपण हलक्या आवाजातील संगीत व्यवस्था करू शकता. शक्यतो बेडरुममध्ये अन्न खाणं टाळावं. सूर्यप्रकाश आणि हवेची व्यवस्था असेल तर ते खूप चांगलं होईल.
बाथरुममध्ये थेंब थेंब पाणी टपकत ठेवू नका
जीवनातील समस्या या ठिकाणाहून नियंत्रित केल्या जातात. बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा. या ठिकाणी पाणी वाया घालवू नका. बाथरूममध्ये निळा किंवा जांभळा रंग वापरणे खूप फायदेशीर आहे. बाथरूममध्ये हलका सुगंध येत राहिला तर चांगलं होईल. बेडरूममध्ये नदी, तलाव, धबधबा, युद्ध किंवा कोणत्याही धोकादायक प्राण्याचं चित्र अजिबात लावू नका.