शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजासारखी एक रहस्यमय खोली प्रत्येकाजवळ असावी; काय होते गुपित ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 09:31 IST

राजासारखी एक रहस्यमय खोली प्रत्येकाकडे असावी. ही खोली माती विटांची, भिंतींची नसली तरी चालेल, ती मनाच्या कोपऱ्यात जरूर असावी.

एक राजा होता. जो नि:संतान होता. वयोमानाने थकला होता. त्याच्या राज्याला उत्तराधिकारी नसल्याने तो नेहमी चिंतीत असे. राज्याचा कारभार उचित हाती सोपवून राजाला निवृत्ती घ्यायची होती. पण ही जबाबदारी सोपवायची कोणाला, याबद्दल राजाने प्रधानाशी सल्ला मसलत केली. 

तत्कालीन व्यवस्थेप्रमाणे अशी परिस्थिती उद्भवल्यास हत्तीच्या सोंडेत पुष्पमाला सोपवून राजा निवडण्याची तयारी दर्शवावी, असे प्रधानाने सुचवले. राजाला पटले. त्याने राज्यात दवंडी पिटवली. हत्तीची सूक्ष्म दृष्टी व्यक्तीची पारख करताना चुकत नाही, या बाबीवर विश्वास ठेवून पंचक्रोशीतल्या लोकांना बोलावून राज्याच्या प्रिय हत्तीला जबाबदारी सोपवली. हत्तीने तीन -चार परिक्रमा घातल्या. सर्वांची उत्कंठा वाढली. अचानक त्याने एका फाटक्या वेषातल्या युवकाच्या गळ्यात पुष्पमाला घातली. टाळ्यांचा कडकडाट झाला. नवीन राजा नियुक्त झाला. राजाची काळजी मिटली. राज्याची सूत्र त्याच्या हाती सोपवून त्याने निवृत्ती घेतली. 

नवीन राजा पूर्वानुभव नसतानाही सहकाऱ्यांच्या मदतीने, नम्रपणे राज्यकारभार करू लागला. लोकांची नवीन राजावर श्रद्धा बसू लागली. हा नवनिर्वाचित राजा रोज दिवसभराचे काम काज आटोपून एका बंद खोलीत एकटाच जात असे. तिथे तासभर घालवून मग झोपी जात असे. त्या खोलीच्या चाव्या फक्त राजाकडे होत्या. राज दरबारातल्या लोकांमध्ये तो उत्सुकुतेचा विषय झाला. ही चर्चा राज्यभर पसरली. एक दोघांनी राजाला विचारून पाहिले पण त्याने उत्तर द्यायचे टाळले. 

लोकांची वाढती चर्चा पाहून शेवटी एक दिवस राजाने दरबार भरवला आणि सांगितले, 'आज मी तुम्हाला त्या बंद दालनाविषयी सांगणार आहे. तिथे तुमच्या कल्पनेतली एकही वस्तू नाही. तर तिथे आहे माझा जुना अंगरखा. तोच अंगरखा, जो मी राजा म्हणून नियुक्त झालो त्या दिवशी घातला होता. तो मी त्या बंद दालनात जतन करून ठेवला आहे.' 

तसे करण्यामागचे नेमके कारण काय, असे प्रधानाने विचारले असता राजा म्हणाला, 'आपले मूळ काय, आपण कोणत्या परिस्थितीतुन आलो, आपले हात आकाशाला लागले तरी आपले नाते धरणीशी आहे या गोष्टींची जाणीव सतत होत राहावी आणि डोक्यात अहंकाराचा शिरकाव होऊ नये, म्हणून मी रोज तो अंगरखा पाहतो. चिंतन करतो. जे मिळाले आहे ते देव दयेने मिळाले आहे. मला ते जबाबदारीने पार पाडायचे आहे आणि अमुक एका वेळी मलाही निवृत्त व्हायचे आहे, याची जाणीव मला हा अंगरखा कायम देत राहील.' 

या कथेतून बोध हाच घ्यायचा, की राजासारखी एक रहस्यमय खोली प्रत्येकाकडे असावी. ही खोली माती विटांची, भिंतींची नसली तरी चालेल, ती मनाच्या कोपऱ्यात जरूर असावी. कारण त्या खोलीत आपले जुने दस्तावेज, आपल्या आठवणी आणि आपले सोनेरी दिवस कैद असतात! त्याची वरचेवर उजळणी होत राहिली की अहंकाराचा वारा आपल्यालाही कधीच लागणार नाही.  तुमच्याकडे आहे अशी रहस्यमय खोली? 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी