Ekadashi Tithi Vrat In 2026 Date List: शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं । विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्ण शुभांगम् । लक्ष्मीकांत कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं । वन्दे विष्णु भवभयहरं सर्व लौकेक नाथम् ॥ ३० डिसेंबर रोजी २०२५ मधील अखेरची पुत्रदा (स्मार्त) एकादशी आहे. तर, ३१ डिसेंबर रोजी २०२५ मधील शेवटची भागवत एकादशी आहे. मराठी महिन्यातील पौष महिना सुरू असून, २०२५ या वर्षाची सांगता एकादशी तिथीने होणार आहे. प्रत्येक एकादशीला व्रत करून श्रीविष्णूंची उपासना करण्याची प्राचीन परंपरा भारतीय संस्कृतीत आहे. सन २०२६ मध्ये किती एकादशी तिथी येणार? यंदा असलेल्या अधिक महिन्यातील एकादशी व्रताचरण कधी करायचे? सविस्तर माहिती जाणून घेऊया...
प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. भगवान श्रीविष्णूंची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची ख्याती आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. वैष्णव, शैव, सौर आदी व विशेषत: सर्व विष्णूभक्त एकादशीचे व्रताचरण करतात. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवत’ असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी तिथी येतात. दिवसभर उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे. या दिवशी उपवास केला असता सर्व कामना परिपूर्ण होतात व वैष्णवपदही प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
प्रदेशपरत्वे एकादशीव्रत आचरण्याचे प्रकार भिन्न
सर्व एकादशी तिथींमध्ये काही एकादशी तिथींचे विशेष महत्त्व असल्याचे म्हटले जाते. वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. आषाढ शुद्ध एकादशी महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले. कार्तिक शुद्ध एकादशीस विष्णू जागे होतात म्हणून प्रबोधिनी असे नाव पडले. आषाढी व कार्तिकी ह्या एकादशी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस ‘गीताजंयती’ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रदेशपरत्वे एकादशीव्रत आचरण्याचे भिन्न प्रकार आढळतात.
वर्षातून २४ एकादशी तिथी येतात, पण २०२६ मध्ये दोन एकादशींची भर
प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी तिथी येतात. शुक्ल पक्षातील एकादशी तिथींची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी. तर, वद्य पक्षातील एकादशींची नावे: वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्तिला, विजया व पापमोचनी. यंदा २०२६ या वर्षात ज्येष्ठ महिना अधिक असणार आहे. अधिक मासातील दोन्ही एकादशींना कमला असे नाव असते.
जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या संपूर्ण वर्षांत येणाऱ्या एकादशी तिथी
जानेवारी महिना २०२६
- पौष महिना कृष्ण पक्ष - षट्तिला एकादशी - बुधवार, १४ जानेवारी २०२६
- माघ महिना शुद्ध पक्ष - जया एकादशी - गुरुवार, २९ जानेवारी २०२६
फेब्रुवारी महिना २०२६
- माघ महिना कृष्ण पक्ष - विजया एकादशी - शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६
- फाल्गुन महिना शुद्ध पक्ष - आमलकी एकादशी - शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६
मार्च महिना २०२६
- फाल्गुन महिना कृष्ण पक्ष - पापमोचनी एकादशी - रविवार, १५ मार्च २०२६
- चैत्र महिना (मराठी नववर्ष) शुद्ध पक्ष - कामदा एकादशी - रविवार, २९ मार्च २०२६
एप्रिल महिना २०२६
- चैत्र महिना कृष्ण पक्ष - वरुथिनी एकादशी - सोमवार, १३ एप्रिल २०२६
- वैशाख महिना शुद्ध पक्ष - मोहिनी एकादशी - सोमवार, २७ एप्रिल २०२६
मे महिना २०२६
- वैशाख महिना कृष्ण पक्ष - अपरा एकादशी - बुधवार, १३ मे २०२६
- अधिक ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष - कमला एकादशी - बुधवार, २७ मे २०२६
जून महिना २०२६
- अधिक ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष - कमला एकादशी - गुरुवार, ११ जून २०२६
- निज ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष - निर्जला एकादशी - गुरुवार, २५ जून २०२६
जुलै महिना २०२६
- निज ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष - योगिनी स्मार्त एकादशी - शुक्रवार, १० जुलै २०२६
- निज ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष - भागवत एकादशी - शनिवार, ११ जुलै २०२६
- आषाढ महिना शुद्ध पक्ष - आषाढी देवशयनी एकादशी - शनिवार, २५ जुलै २०२६
ऑगस्ट महिना २०२६
- आषाढ महिना कृष्ण पक्ष - कामिका एकादशी - रविवार, ०९ ऑगस्ट २०२६
- श्रावण महिना शुद्ध पक्ष - श्रावण पुत्रदा एकादशी - रविवार, २३ ऑगस्ट २०२६
सप्टेंबर महिना २०२६
- श्रावण महिना कृष्ण पक्ष - श्रावण अजा एकादशी - सोमवार, ०७ सप्टेंबर २०२६
- भाद्रपद महिना शुद्ध पक्ष - परिवर्तिनी एकादशी - मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६
ऑक्टोबर महिना २०२६
- भाद्रपद महिना कृष्ण पक्ष - इंदिरा एकादशी - मंगळवार, ०६ ऑक्टोबर २०२६
- अश्विन महिना शुद्ध पक्ष - पापांकुशा एकादशी - गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६
नोव्हेंबर महिना २०२६
- अश्विन महिना कृष्ण पक्ष - रमा एकादशी - गुरुवार, ०५ नोव्हेंबर २०२६
- कार्तिक महिना शुद्ध पक्ष - कार्तिकी प्रबोधिनी स्मार्त एकादशी (विष्णुप्रबोधोत्सव) - शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६
- कार्तिक महिना शुद्ध पक्ष - भागवत एकादशी - शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६
डिसेंबर महिना २०२६
- कार्तिक महिना कृष्ण पक्ष - उत्पत्ति एकादशी - शुक्रवार, ०४ डिसेंबर २०२६
- मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष - मोक्षदा एकादशी - रविवार, २० डिसेंबर २०२६
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
Web Summary : 2026 features 26 Ekadashis due to an extra month. This guide details dates for each Ekadashi, including the additional 'Kamala' Ekadashis. Ekadashi, dedicated to Vishnu, involves fasting and devotion, with varied regional practices. Key Ekadashis like Ashadhi and Kartiki hold special importance, especially in the Warkari tradition.
Web Summary : 2026 में एक अतिरिक्त महीने के कारण 26 एकादशी हैं। यह मार्गदर्शिका प्रत्येक एकादशी की तिथियों का विवरण देती है, जिसमें अतिरिक्त 'कमला' एकादशी भी शामिल हैं। विष्णु को समर्पित एकादशी में उपवास और भक्ति शामिल है, जिसमें विभिन्न क्षेत्रीय प्रथाएं हैं। आषाढ़ी और कार्तिकी जैसी प्रमुख एकादशी का विशेष महत्व है, खासकर वारकरी परंपरा में।