शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:26 IST

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन हे लहान मोठ्यांसाठी विशेष आकर्षण असते, पण त्याबरोबरच एक प्रथा जोडली आहे, ती माहितीय का? वाचा!

२ ऑक्टोबर रोजी दसरा(Dussehra 2025) आहे. त्यादिवशी रावण दहनाची प्रथा, आपट्याचे पान देऊन सोनं लुटण्याची प्रथा, देवदर्शनाला जाण्याची जशी पारंपरिक आहे, त्याचप्रमाणे आणखीही काही वैशिष्ट्यपूर्ण तर काही महत्त्वपूर्ण प्रथा आहेत, ज्या पार पाडल्या असता तिचा लाभ वर्षभर होतो, असे म्हणतात. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ. 

Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!

अश्विन महिन्यात नवरात्रीच्या(Navratri 2025) दहाव्या दिवशी देशभरात दसरा (Dussehra 2025) किंवा विजयादशमीचा (Vijayadashami 2025) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. यावेळी ही शुभ तिथी गुरुवार २ ऑक्टोबर रोजी आहे. दसऱ्याच्या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. यादिवशी शस्त्रपूजा केली जाते. विजयादशमीच्या सणाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे भगवान रामाने रावणाचा वध आणि देवी दुर्गेने महिषासुराचा शेवट. या विजयाचा आनंद केवळ देशभरातच नाही, तर जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी रामलीलेत रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.

नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!

रावण दहनानंतर 'हे' काम करा

दसऱ्याला रावणाचे मोठे पुतळे दहन केले जातात. रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याचा शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर रात्री ८.३० पासून असेल. रावण दहन नेहमीच प्रदोष काळात फक्त श्रवण नक्षत्रातच केले जाते. अश्विन महिन्यातील दशमी तिथीला नक्षत्र उगवते तेव्हा सर्व कार्ये पूर्ण होतात. रावण दहनानंतर त्याची थोडीशी राख घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. ही रक्षा रामाने दुष्ट प्रवृत्तीवर केलेली मात याची जाणीव करून देते. ती एका पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात समृद्धी राहते असे म्हणतात. 

Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Facebook, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

दसऱ्याचे महत्व

दसरा तिथीची संध्याकाळची वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि हा काळ विजय काल म्हणून ओळखला जातो. ज्योतिषांच्या मते, या मुहूर्तावर तुम्ही कोणतेही काम सुरु कराल, त्यात तुम्हाला विजय मिळेल, पण ते काम तुम्हाला मनापासून करावे लागेल, अशी अट आहे. कोणतेही नवीन काम किंवा गुंतवणूक, नवीन विषयाच्या अध्ययनाची सुरुवात अशा अनेक शुभ गोष्टी करू शकता. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय, कार खरेदी, घर खरेदी या मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते. लोकश्रद्धेनुसार दसऱ्याच्या दिवशी नीळकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. पण आजकाल नीलकंठ पक्षी क्वचितच दिसतात.

शमीची पूजा 

दसऱ्याच्या संध्याकाळी शमीच्या झाडाची पूजा करण्याचीही प्रथा आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भाग्य उजळते आणि ग्रह-नक्षत्रांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. नवरात्रीमध्ये शमीच्या पानांनी देवीची पूजा केली जाते. यासोबतच शमीची पाने महादेवालाही अर्पण केली जातात. दुसरीकडे, शमीचे झाड हे न्याय देवता शनिचे असल्याचे मानले जाते. त्यालाही शमी अर्पण केली जाते. 

Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?

जया-विजया देवीची पूजा:

दसर्‍याचा सण पावसाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूचा प्रारंभ दर्शवतो. या दिवशी अपराजिता देवीसोबत जया आणि विजया यांचीही पूजा केली जाते. जे लोक दरवर्षी दसऱ्याला जय आणि विजयाची पूजा करतात, त्यांना नेहमी शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्यांना कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. असे मानले जाते की भगवान रामाने नऊ दिवस माता दुर्गेची पूजा केली आणि नंतर जया-विजया देवींची पूजा केली. यानंतर राम रावणाशी लढायला निघाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Dussehra 2025: Significance of Ravana ashes and traditions explained.

Web Summary : Dussehra 2025 celebrates good over evil. Burning Ravana effigies, distributing Aapta leaves, and worshipping are traditions. Bringing Ravana's ashes home is considered auspicious, symbolizing victory and prosperity.
टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण