चुकूनही वापरू नका ‘अशा’ रंगांच्या चपला; होऊ शकेल मोठे नुकसान, समस्या वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:13 IST2022-07-07T15:10:52+5:302022-07-07T15:13:19+5:30
सध्याच्या फॅशनच्या युगात क्षणक्षणाला नवनवी फॅशन येते. आधी तर फक्त कपड्यांच्या फॅशनची चलती होती. पण आता अगदी चपला, बूट, पाकिट असो किंवा मग अगदी हेअरपीन सगळ्याच बाबतीत काहीतरी नवं आणि हटके वापरण्याचा तरुणाईचा कल असतो.

चुकूनही वापरू नका ‘अशा’ रंगांच्या चपला; होऊ शकेल मोठे नुकसान, समस्या वाढणार!
नवी दिल्ली-
सध्याच्या फॅशनच्या युगात क्षणक्षणाला नवनवी फॅशन येते. आधी तर फक्त कपड्यांच्या फॅशनची चलती होती. पण आता अगदी चपला, बूट, पाकिट असो किंवा मग अगदी हेअरपीन सगळ्याच बाबतीत काहीतरी नवं आणि हटके वापरण्याचा तरुणाईचा कल असतो. आपण परिधान केलेल्या कपड्यांना साजेशी चप्पल किंवा बूट असावेत असाही चंग असतो. त्यासाठी घरात जवळपास प्रत्येक रंगाच्या चपला असणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. पण चप्पल किंवा बूट खरेदी करताना एक छोटीशी चूक व्यक्तीला कंगाल करू शकते.
ज्योतिषाचार्य शैलेंद्र पांड्ये यांच्या मतानुसार बूट किंवा चप्पल खरेदी करताना बहुतांश लोक केवळ स्टाइलवर लक्ष देतात. तसंच आपल्याला कोणते शूज किंवा चपला आपल्याला सुंदर दिसतील याच गोष्टी पाहण्याकडे कल असतो. पण यातच एका गोष्टीची खूप मोठी गल्लत होते. ज्यामुळे सुख, वैभव, धन, वैवाहिक जीवन, संतान आणि विवाह संबंधीत ग्रह बृहस्पतिची नाराजी ओढावून घेतली जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार चुकूनही पिवळ्या रंगाच्या चपला, बूट वापरू नयेत. पिवळा रंग बृहस्पतिचा रंग मानला जातो. ज्योतिषविद्येनुसार पिवळ्या रंगाची चप्पल घातल्याने कुंडलीतील बृहस्पति कमकुवत होतो. यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. तसंच घरातील सुख-समृद्धीवरही याचा परिणाम होऊ शकतो.
कोणत्या रंगाचे बूट वापरावेत?
ज्योतिषविद्येतील माहितीनुसार काळ्या, निळ्या किंवा चॉकलेटी रंगाचे बूट, चपला वापराव्यात. तुम्ही जर अगदीत तुमच्या स्टाइल किंवा फॅशनला मुरड घालू शकणार नसाल तर लाल रंगाच्याही चपला वापरू शकता. पण पिवळ्या रंगाच्या चपला किंवा बूट अजिबात वापरू नयेत.