शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Diwali 2023: दिवाळीची साफसफाई करताना वास्तुशास्त्राने सांगितलेले नियम पाळा; दुप्पट लाभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 08:13 IST

Diwali Vastu Shastra: एरव्ही घर आपण स्वच्छच ठेवतो, पण दिवाळीत विशेष स्वच्छता अभियान हाती घेतो, त्यावेळी काही नियम पाळायला हवे असे वास्तुशास्त्र सांगते; त्याबद्दल... 

आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सगळेच जण रोज प्रयत्न करतो. स्वच्छ घरात वातावरण प्रसन्न राहते आणि प्रसन्न वातावरणामुळे मनही प्रसन्न राहते. म्हणजेच स्वच्छतेचा परिणाम थेट आपल्या तना-मनावर होत असतो. यासाठी वास्तू शास्त्रात दिलेले पुढील नियम अवश्य पाळा. त्याचा लाभ होऊन वास्तू दोष निर्माण होणार नाहीत आणि असल्यास दूर होतील. 

>>ब्रह्म मुहूर्तावर आणि तिन्ही सांजेला घरात केर काढू नये. हे दोन्ही मुहूर्त लक्ष्मीच्या आगमनाचे मुहूर्त मानले जातात. त्यामुळे स्वच्छता करायची असल्यास या मुहूर्ताच्या आधी किंवा नंतर केर काढावा. 

>>घरातील कोपरे स्वच्छ ठेवावेत. विशेषतः ईशान्य, उत्तर, वायव्य या दिशांचे कोपरे स्वच्छ असावेत. 

>>घरात कचरा टाकू नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच केराचा डबा वेळच्या वेळी धुवून स्वच्छ ठेवा. 

>>गुरुवार सोडून आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून घराची जागा पुसा. त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. वादविवाद संपतील. तसेच लक्ष्मी घरात स्थिर राहील. 

>>घराच्या स्वच्छतेइतकेच घरातल्या प्रसाधन गृहालाही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जाळे, जळमट लागू देऊ नका. तसेच तिथली फरशी स्वच्छ ठेवा. वास्तू मध्ये नकारात्मकता तिथून प्रवेश करते. म्हणून तेथील स्वच्छतेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. 

>>घरात फार काळ अडगड साचू देऊ नका. अडगळ साचल्यामुळे घरात वाद विवाद होतात. घरातल्या लक्ष्मीचा क्षय होतो. घरात अडगळ असणे, हे वास्तूच्या दृष्टीने घातक मानले जाते. म्हणून पेपरची रद्दी असो नाहीतर जुन्या आणि वापरात नसलेल्या तुटक्या वस्तू असोत. त्यांची वेळोवेळी विल्हेवाट लावायला शिका. 

>>वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते. 

>>घराइतकाच महत्त्वाचा आहे घराचा उंबरठा. तो रोजच्या रोज स्वच्छ करून, शक्य असल्यास सायंकाळी उंबरठ्याजवळ दिवा लावून त्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. तसेच रोज सकाळी दोन बोटं रांगोळी काढा. तो लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असल्याने तेथील स्वच्छताही महत्त्वाची आहे. 

>>नीटनेटके आवरलेले घर जसे आपल्याला आवडते, तसे देवालाही आवडते. अशा घरात सुख, शांती, समृद्धी सदैव नांदते. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीVastu shastraवास्तुशास्त्र