शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:54 IST

Dhanteras 2025 Puja Importance: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे, या दिवशी सुदृढ आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची पुजा करतात, पण पाठोपाठ लक्ष्मी पूजा का? यामागचे कारण जाणून घ्या.

Dhanteras 2025 Puja Mahatva: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (Dhanteras 2025)आहे. अनेक जण त्या दिवशी देखील पैसे, सोने, चांदीची, दागिने यांची पूजा करतात. मात्र मुळात हा दिवस असतो भगवान धन्वंतरीचा! त्यांना आरोग्याची देवता म्हटले जाते. केवळ पैसा हाताशी असून उपयोग नाही तर तो उपभोगण्यासाठी आरोग्यही उत्तम पाहिजे. त्यासाठी लक्ष्मी पूजेच्या आधी धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. तरीदेखील या शुभ दिनी अनेक जण सोनं-चांदीची खरेदी करतात. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभावा हे त्यामागील कारण आहेच, शिवाय त्याला एका पौराणिक कथेची देखील पार्श्वभूमी आहे. 

Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल!

वसुबारस पाठोपाठ धनत्रयोदशी येते आणि दिवाळीची (Diwali 2025) रंगत वाढत जाते. अश्विन वद्य त्रयोदशीला हा सण केला जातो. या शुभ मुहूर्तावर, प्रदोष काळात, देवी लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी (Dhanteras 2025) यांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही पूजा केल्याने व्यक्तीला धनाची प्राप्ती होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या खरेदीमुळे धन संपत्तीत वाढ होत जाते. तसेही हिंदू धर्मानुसार शुभ दिवशी सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पण पौराणिक पार्श्वभूमी कोणती ते पाहू. 

पौराणिक पार्श्वभूमी 

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणूनही ओळखले जातात. भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात सुवर्ण कलश होता. त्यातून पाठोपाठ लक्ष्मी प्रगट झाली. म्हणून धन्वंतरी प्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांच्या हाती सोने, चांदीची खरेदी असते त्यांच्यापाठोपाठ लक्ष्मी प्रगट होते आणि कृपावंत राहते. 

Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना!

या पौराणिक कथेमुळे धनत्रयोदशीला सोने, चांदी खरेदीची प्रथा सुरु झाली. ज्यांना ही खरेदी शक्य नाही, त्यांनी आपल्या घरातील सोन्या, चांदीच्या वस्तू धुवून, पुसून लक्ख करून त्यांची पूजा करावी आणि या संपत्तीत वाढ व्हावी अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी!

English
हिंदी सारांश
Web Title : Dhanteras 2025: Significance of worshiping Dhanvantari and Lakshmi explained.

Web Summary : Dhanteras, celebrated on October 18th, honors Dhanvantari, the god of health, and Lakshmi. People buy gold and silver, believing it brings Lakshmi's blessings due to the story of Dhanvantari's emergence with a golden pot during the Samudramanthan.
टॅग्स :Diwaliदिवाळी २०२५Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीLaxmi Pujanलक्ष्मीपूजनIndian Festivalsभारतीय उत्सव-सणTraditional Ritualsपारंपारिक विधी