Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:54 IST2025-10-15T17:53:22+5:302025-10-15T17:54:45+5:30

Dhan Teras 2025: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे, या दिवशी सुदृढ आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची पुजा करतात, पण पाठोपाठ लक्ष्मी पूजा का? यामागचे कारण जाणून घ्या.

Dhan Teras 2025: There is a mythological reason behind worshipping Dhanvantari and Lakshmi on Dhantrayodashi! | Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी (Dhan Teras 2025)आहे. अनेक जण त्या दिवशी देखील पैसे, सोने, चांदीची, दागिने यांची पूजा करतात. मात्र मुळात हा दिवस असतो भगवान धन्वंतरीचा! त्यांना आरोग्याची देवता म्हटले जाते. केवळ पैसा हाताशी असून उपयोग नाही तर तो उपभोगण्यासाठी आरोग्यही उत्तम पाहिजे. त्यासाठी लक्ष्मी पूजेच्या आधी धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. तरीदेखील या शुभ दिनी अनेक जण सोनं-चांदीची खरेदी करतात. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभावा हे त्यामागील कारण आहेच, शिवाय त्याला एका पौराणिक कथेची देखील पार्श्वभूमी आहे. 

Diwali 2025: वसुबारसेला कामधेनुची मूर्ती घराच्या 'या' दिशेला ठेवल्याने होणारे फायदे वाचून अवाक व्हाल!

वसुबारस पाठोपाठ धनत्रयोदशी येते आणि दिवाळीची (Diwali 2025) रंगत वाढत जाते. अश्विन वद्य त्रयोदशीला हा सण केला जातो. या शुभ मुहूर्तावर, प्रदोष काळात, देवी लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी (Dhan Teras 2025) यांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही पूजा केल्याने व्यक्तीला धनाची प्राप्ती होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्या खरेदीमुळे धन संपत्तीत वाढ होत जाते. तसेही हिंदू धर्मानुसार शुभ दिवशी सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पण पौराणिक पार्श्वभूमी कोणती ते पाहू. 

पौराणिक पार्श्वभूमी 

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणूनही ओळखले जातात. भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात सुवर्ण कलश होता. त्यातून पाठोपाठ लक्ष्मी प्रगट झाली. म्हणून धन्वंतरी प्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांच्या हाती सोने, चांदीची खरेदी असते त्यांच्यापाठोपाठ लक्ष्मी प्रगट होते आणि कृपावंत राहते. 

Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना!

या पौराणिक कथेमुळे धनत्रयोदशीला सोने, चांदी खरेदीची प्रथा सुरु झाली. ज्यांना ही खरेदी शक्य नाही, त्यांनी आपल्या घरातील सोन्या, चांदीच्या वस्तू धुवून, पुसून लक्ख करून त्यांची पूजा करावी आणि या संपत्तीत वाढ व्हावी अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी!

Web Title : धनतेरस 2025: धनवंतरी और लक्ष्मी की पूजा का महत्व।

Web Summary : धनतेरस, 18 अक्टूबर को, स्वास्थ्य के देवता धनवंतरी और लक्ष्मी का सम्मान करता है। लोग सोना-चांदी खरीदते हैं, यह मानते हुए कि समुद्र मंथन के दौरान धनवंतरी के सुनहरे बर्तन के साथ निकलने की कहानी के कारण यह लक्ष्मी का आशीर्वाद लाता है।

Web Title : Dhanteras 2025: Significance of worshiping Dhanvantari and Lakshmi explained.

Web Summary : Dhanteras, celebrated on October 18th, honors Dhanvantari, the god of health, and Lakshmi. People buy gold and silver, believing it brings Lakshmi's blessings due to the story of Dhanvantari's emergence with a golden pot during the Samudramanthan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.