शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

देवासी अवतार भक्त्तांसी संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 03:06 IST

देहू, आळंदीहून निघालेल्या दिंड्या-पालख्या पुण्यात स्थिरावलेल्या असताना दिंड्या-पालख्यांच्या छत्र, चामरांच्या, अश्व, अब्दागिऱ्यांच्या वैभवासोबत व टाळ, मृदुंग, वीणा वाजवीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा नामघोष करणाºया वारकऱ्यांसोबत वासुदेवही पालखीत असतात. भारूड व लळीतांमध्ये वासुदेवाचे सोंग काढले जाते. बाळसंतोष, जोशी, सौरी, अशी सोंगे भारुडात सादर होतात.

- प्रा.डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयकअलंकापुराहून संत ज्ञानेश्वर महाराज व देहूहून तुकाराम महाराज यांच्या दिंड्या-पालख्या पुण्यात येतात तेव्हा संपूर्ण पुणे शहर व परिसर विठ्ठलाच्या, माउलीच्या नामघोषाने दुमदुमून जातो. पंढरपूरपर्यंत पुरेल इतके धान्य, भाजीपाला, अन्य जिन्नस खरेदीसाठी बाजारात भाविकांच्या उड्या पडतात.प्रपंच सोडून विठ्ठलभक्तीच्या परमार्थाकडे वळलेली वारकºयांची पावले जणू वारीच्या प्रपंचासाठी उत्साहात असतात. प्रपंच व परमार्थ यांच्यातील विसंवाद नव्हे, तर सुसंवाद साधण्याचे मोठे योगदान वारकरी संप्रदायाचे आहे. कर्मालाच योग मानणे हे या संप्रदायाच्या भक्तीचे वर्म आहे. ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दृष्काळे पीडा केली’ अशी उद्विग्नता व त्यातून आलेली विरक्ती संत तुकाराम महाराजांनी व्यक्त केली असली वा ‘संसार दु:ख मूळ चहूकडे इंगळ। विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।’ असे संतांनी म्हटलेले असले तरी संतांनी नेटका प्रपंच करून परमार्थ साधनेची शिकवण दिली. यामुळेच जनाबार्इंना जाते सुंदर वाटते. त्या म्हणतात, ‘सुंदर माझे जाते गं, फिरते बहुत ओव्या गावू कवतिके, तू ये रे बा विठ्ठला।’ जिवा-शिवाच्या दोन्ही पाळ्यांचे जाते जनाबार्इंना प्रपंच व परमार्थाच्या भावविश्वाचे द्योतक वाटते. संतांच्या ‘वासुदेव’ या रूपकातही निद्रा आणि जागृतावस्था यांचे सुरेख चिंतन आहे.अल्प आयुष्य मानव देह।शत गणिले ते अर्ध रात्र खाय।मध्ये बालत्व पीडा रोग क्षय।काय भजनासी उरले ते पाहे गा।क्षणभंगुर नाही भरंवसा।व्हावे सावध तोडा माया आशा।काही न चाले पडेल गळां फासा।अशा या ‘वासुदेव’ या रूपकातूनतुकारामांनी क्षणभंगुर आयुष्याचे चिंतन केले आहे. वासुदेव वारीत‘रामकृष्ण वासुदेवा।जागवी जनासीवाजवी चिपळिया। टाळ घागºयाघोषे रामकृष्ण वासुदेवा’असे चिंतन करतात.राम कृष्ण गीतीं गात। टाळ चिपळ्या वाजवीत। छंदे आपुलिया नाचत। नीज घेऊनी फिरत गा।।असे तुकारामांनी म्हटले आहे. वासुदेव नीज घेऊन फिरतो म्हणजे त्याच्यासोबत असलेले त्याचे श्रेयस व प्रेयस म्हणजे साक्षात परमेश्वर अंतरी घेऊन फिरतो. ‘अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ’ असा संदेश वासुदेव देतो. प्रपंचाची निरर्थकता व परमार्थाची सार्थकता स्पष्ट करीत दान पावलं, दान पावलं म्हणतो. आता पालखी-दिंड्यांचा सोहळा व त्यातील वासुदेवाच्या संकीर्तनाला आपण पारखे झालो आहोत. कोरोनामुळे ‘अल्पआयुष्य मानवदेह’ झाले आहे दुसरे काय?