इंग्रजी वर्षांचा शेवटचा महिना डिसेंबर. या महिन्यात जन्मलेले लोक जुन्या, नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभे असतात. त्यांच्या स्वभावातही हा संमिश्रपणा दिसून येतो. त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, चांगले वाईट गुण, दोष याबद्दल ज्योतिष शास्त्राच्या मदतीने माहिती घेऊया.
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
डिसेंबरमध्ये जन्माला(December born Astro) आलेल्या व्यक्तींना वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास असतो. मात्र हा आत्मविश्वास स्वयंप्रेरणेने आलेला नसून तो दुसऱ्यांच्या भरवशावर त्यांनी मिळवलेला असतो. याचे कारण, हे लोक फार आळशी असतात. स्वत: काही करो न करो, मात्र दुसऱ्यांकडून यांच्या ढीगभर अपेक्षा असतात. त्या अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत आणि अपेक्षाभंगाचे दु:खं त्यांना झेलावे लागते. कुटुंबावर भरपूर प्रेम असूनही कुटुंबियांकडून यांना नेहमी तक्रारीचा सूर ऐकावा लागतो. त्याला कारणीभूत त्यांचा आळस असतो.
डिसेंबरच्या पहिल्या १५ दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी आणि गर्विष्ठ असतात, तर शेवटच्या १५ दिवसांत जन्मलेले अतिशय सृजनशील, कलाकार आणि हौशी असतात.
या लोकांना कल्पनाविश्वात रमणे आवडते. वास्तव जगापासून ते कोसो दूर असतात. अशा दिवा स्वप्नांमुळे ते अनेक संधी गमावून बसतात. दुसऱ्याला कमी समजणे ही आणखी एक मेख त्यांच्या ठायी असते. या कारणामुळे ते आप्तस्वकीयांपासून दुरावतात.
आकर्षणाच्या बाबतीत म्हणाल, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे असते. त्यामुळे कर्तृत्त्वाची जोड असो वा नसो त्यांच्यावर अनेक जण पटकन भाळतात. त्यांच्यावर अनेकांचे प्रेम जडते तसेच हे अनेकांच्या प्रेमात पडतात, परंतु नाते स्वीकारले की ते एकनिष्ठपणे निभावतात. या लोकांमध्ये तरुणपणात पाय घसरण्याची दाट शक्यता असते. परंतु संस्कारांचा पगडा असेल, तर ते आयुष्य मार्गी लावू शकतात.
Astro Tips: शुक्रवार आणि दुर्गाष्टमी: धनवृद्धीसाठी २ शुभ तिथींचा महायोग आणि ज्योतिषीय उपाय!
या महिन्यात जन्मलेल्या मुली मात्र अत्यंत चालाख असतात. गोड बोलून समोरच्याकडून आपले काम कसे काढून घ्यायचे ही कला त्यांना चांगली अवगत असते. स्वभाव काहीसा अबोल असतो. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे याची समोरच्याला कल्पना येत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी स्वभावात थोडा बदल केला, दैनंदिन सवयींमध्ये सुधारणा केली, तर ते लोकप्रिय व्यक्तीदेखील बनू शकतात. त्यांनी समोरच्याला मान दिला तर आपोआप त्यांनाही मान मिळू शकेल. त्यांना जशी स्वस्तुती आवडते, तशी त्यांनी इतरांचीही मुक्तकंठाने स्तुती केली पाहिजे. पैशांचे व्यवहार जपून केले पाहिजे. कुटुंबाबद्दल केवळ प्रेम बाळगून उपयोग नाही, ते योग्य प्रकारे व्यक्त केले, तरच त्यांनाही कुटुंबात तेवढाच मान आणि भरपूर प्रेम मिळू शकेल.
Datta Jayanti 2025: गुरुचरित्र वाचायची इच्छा आहे, पण वेळ नाही? ९ दिवस म्हणा 'हे' कवन!
या लोकांनी आपल्या भीतीवर मात करून आत्मविश्वासाने आपल्या करिअरमध्ये पाऊल टाकले तर त्यांना कोणीही अडवू शकणार नाही. एकदा का यश मिळाले, तर ते त्यांच्या स्वभावानुसार दुसऱ्यांकडून सहज कामे करवून घेऊ शकतील. त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण असतात. फक्त त्यासाठी संवादकौशल्य विकसित केले पाहिजे. या लोकांना नोकरीपेक्षा व्यवसायात चांगले यश मिळू शकते. अर्थात त्यासाठी जाणकारांचा सल्ला घेऊन मगच कोणत्याही व्यवसायात पदार्पण करा.
या महिन्यात जन्मलेल्या आणि प्रसिद्ध झालेल्या लोकांचाही आदर्श तुम्हाला ठेवता येईल. जसे की रतन टाटा, अटल बिहारी वाजपेयी, धिरूभाई अंबानी, शरद पवार, धमेंद्र, मोहम्मद रफी, सोनिया गांधी, युवराज सिंग, उदित नारायण, अरुण जेटली इ.
Web Summary : December-born individuals are confident but lazy, relying on others. They are creative but live in a dream world, missing opportunities. Attractive and loving, they need to manage finances and express love to family. Success awaits with confidence and improved communication.
Web Summary : दिसंबर में जन्म लेने वाले व्यक्ति आत्मविश्वासी लेकिन आलसी होते हैं, दूसरों पर निर्भर रहते हैं। वे रचनात्मक हैं लेकिन एक सपनों की दुनिया में रहते हैं, जिससे अवसर चूक जाते हैं। आकर्षक और प्यार करने वाले, उन्हें वित्त का प्रबंधन करने और परिवार के प्रति प्यार व्यक्त करने की आवश्यकता है। आत्मविश्वास और बेहतर संचार के साथ सफलता मिलती है।