चाणक्य नीती: समाजात आपला दबदबा निर्माण करायचाय? मग आत्मसात करा 'ही' ५ प्रभावी सूत्रे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:55 IST2026-03-04T11:54:29+5:302026-03-04T11:55:10+5:30
Chanakya Niti: यशस्वी लोक केवळ मेहनत करून यशस्वी होत नाहीत तर त्यांच्या वागण्या बोलण्यातही पथ्य पाळतात; कोणती ते चाणक्यनीतीतून जाणून घेऊ.

चाणक्य नीती: समाजात आपला दबदबा निर्माण करायचाय? मग आत्मसात करा 'ही' ५ प्रभावी सूत्रे!
आचार्य चाणक्य यांनी राजकारण आणि समाजकारणात व्यक्तीचा प्रभाव (Aura) किती महत्त्वाचा असतो, हे हजारो वर्षांपूर्वीच सांगितले आहे. आपला प्रभाव केवळ कपड्यांवरून नाही, तर आपल्या वागण्या-बोलण्यावरून आणि निर्णयांवरून ठरतो. आपला 'ऑरा' कसा वाढवावा ते जाणून घेऊ.
Vastu Tips: झोपताना उशाशी पाण्याची बाटली ठेवता? तुमची ही छोटी चूक ठरू शकते मोठ्या तणावाचं कारण!
१. मौन हेच सामर्थ्य (Power of Silence)
चाणक्य म्हणतात, "मौन हे सर्व प्रश्नांचे सर्वोत्तम उत्तर आहे." तुम्ही जितके कमी आणि मोजके बोलाल, तितके लोक तुमचे शब्द लक्ष देऊन ऐकतील. कमी बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात नेहमीच उत्सुकता (Curiosity) असते. जेव्हा तुम्ही तुमची बुद्धिमत्ता गरजेपुरतीच वापरता, तेव्हा तुमचा प्रभाव आपोआप वाढू लागतो.
२. आपली उपलब्धता मर्यादित ठेवा (Value of Presence)
प्रत्येक ठिकाणी हजर राहणे आणि प्रत्येकासाठी सहज उपलब्ध असणे तुमची किंमत (Value) कमी करते. ज्याप्रमाणे सोन्याची खाण सहज मिळत नाही म्हणून त्याला महत्त्व असते, तसेच तुम्ही तुमची उपस्थिती खास लोकांसाठी आणि खास प्रसंगांसाठी राखून ठेवा. सर्वांशी मिळून-मिसळून राहणे चांगले असले, तरी तुमची एक 'डिग्निटी' राखणे आवश्यक आहे.
३. आत्मविश्वासपूर्ण देहबोली (Confident Body Language)
तुमच्या शब्दांपेक्षा तुमची देहबोली (Body Language) जास्त प्रभावी असावी. ताठ छाती, स्थिर नजर आणि चालण्यातील आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतो. चाणक्य नीतीनुसार, ज्याच्या मनात भीती नसते, त्याच्या शरीराची ठेवण आपोआपच एखाद्या राजासारखी असते. तुमचा आत्मविश्वासच लोकांकडून तुमच्याबद्दल आदर निर्माण करून घेतो.
माझ्यासोबतच असं का होतं?' या प्रश्नाने हैराण आहात? मग प्रेमानंद महाराजांचा हा उपदेश एकदा नक्की वाचा!
४. आपली गुपिते आणि नियोजन लपवून ठेवा (Mystery & Secrecy)
"तुमचे नियोजन कधीही कोणाला सांगू नका," हा चाणक्य नीतीचा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. आपले सर्व पत्ते कधीही उघडू नका. थोडे अनोळखी (Mysterious) राहिल्यामुळे लोक तुमच्याशी जोडले जाण्यासाठी अधिक प्रयत्न करतात. तुमचे यश तुमच्या कामातून दिसू द्या, तुमच्या शब्दांतून नाही.
५. स्वतःचा आदर करा, जगाची मान्यता नको (Self-Respect over Approval)
स्वतःच्या नजरेत 'लेजेंड' बना. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सन्मान देत नाही, तोपर्यंत जग तुम्हाला सन्मान देणार नाही. इतरांच्या मान्यतेची (Approval) वाट पाहण्यापेक्षा, आपल्या मूल्यांवर ठाम राहा. जेव्हा तुम्हाला इतरांच्या 'हो' मध्ये 'हो' मिळवण्याची गरज वाटत नाही, तेव्हाच तुमचा खरा 'ऑरा' निर्माण होतो.