Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:51 IST2026-04-03T17:50:21+5:302026-04-03T17:51:31+5:30

Chanakya Niti: यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीतीचे 'हे' १० सुवर्ण नियम; जे प्रत्येक माणसाला माहीत हवेत!

Chanakya Niti: Want to create the universe from nothing? These 10 thoughts of Acharya Chanakya will definitely give you direction | Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील

Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील

आचार्य चाणक्य यांनी रचलेली 'चाणक्य नीती' आजही तितकीच समर्पक आहे, जितकी ती हजारो वर्षांपूर्वी होती. लेखात दिलेले चाणक्यांचे १० श्रेष्ठ विचार केवळ शब्द नसून यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहेत.

Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!

जगातील महान अर्थतज्ज्ञ आणि धुरंधर राजकारणी आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाचे खूप जवळून निरीक्षण केले होते. त्यांनी सांगितलेले नियम जर आपण आपल्या आयुष्यात उतरवले, तर कोणतीही कठीण परिस्थिती आपल्याला हरवू शकणार नाही. त्यासाठी आचार्यांचे १० विचार जाणून घेऊ. 

१. भविष्य आणि वर्तमान यांचा ताळमेळ :  जी व्यक्ती भविष्याची चिंता करत नाही, ती वर्तमानातही यशस्वी होऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, उद्याची तयारी आजच करणे गरजेचे आहे. नियोजनाशिवाय केलेले काम अनेकदा अपयशाकडे नेते.

२. गुप्तता बाळगा : आपल्या मनातील गुप्त गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. वेळ आल्यावर तीच व्यक्ती त्या गोष्टींचा तुमच्या विरुद्ध वापर करू शकते. विश्वासाच्या नात्यातही मर्यादा असणे महत्त्वाचे आहे.

३. शिक्षण: आपला सर्वात मोठा मित्र : शिक्षण हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे. सुंदर रूप किंवा तारुण्य काळाच्या ओघात निघून जाईल, पण तुमचे ज्ञान मरेपर्यंत तुमच्या सोबत राहील. अज्ञान हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!

४. पैशाचा योग्य वापर : गरजेच्या वेळी जो पैसा वापरला जात नाही, तो व्यर्थ असतो. पैशाची बचत करणे चांगलेच आहे, पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करणे हाच खऱ्या श्रीमंतीचा मार्ग आहे.

५. संयमाची शक्ती : ज्या व्यक्तीकडे धैर्य (Patience) आहे, त्याच्यासाठी जगात कोणतेही काम अशक्य नाही. संकटाच्या वेळी शांत राहून विचार करणे हाच विजयाचा मार्ग असतो.

६. अहंकार: बुद्धीचा विनाशक : अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा माणसाला गर्विष्ठपणा येतो, तेव्हा त्याची विचार करण्याची क्षमता आणि बुद्धी नष्ट होते. नम्रता हीच माणसाची खरी ओळख आहे.

७. खऱ्या मित्राची ओळख : चांगल्या काळात तर सगळेच सोबत असतात, पण जो संकटाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, तोच तुमचा 'सच्चा' मित्र असतो. कठीण काळ हा मित्रांची परीक्षा घेण्याची वेळ असते.

८. आळसाचा त्याग करा : आळस हा माणसाला हळूहळू गरिबीकडे ढकलतो. आळशी माणसाकडे लक्ष्मी कधीच राहत नाही. कष्टाशिवाय प्रगती शक्य नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.

Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा

९. सन्मान असेल तिथेच सुख : ज्या घरात किंवा समाजात एकमेकांचा सन्मान केला जात नाही, तिथे पैसा आणि सुख कधीच टिकत नाही. जिथे आदर आहे, तिथेच समृद्धी नांदते.

१०. इतरांच्या चुकांतून शिका : बुद्धीमान माणूस तोच असतो जो स्वतः चुका करून शिकण्यापेक्षा इतरांच्या चुकांतून धडा घेतो. कारण स्वतः सर्व चुका करून शिकण्यासाठी आपले आयुष्य खूप लहान आहे.

चाणक्य नीती आपल्याला व्यावहारिक जगण्याचे शिक्षण देते. हे १० विचार जर आपण आपल्या रोजच्या सवयींमध्ये सामील केले, तर प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या होतील.

Web Title : चाणक्य नीति: शून्य से विश्व बनाने के लिए 10 मार्गदर्शक सिद्धांत

Web Summary : आचार्य चाणक्य की कालातीत बुद्धिमत्ता व्यावहारिक जीवन के सबक प्रदान करती है। उनके 10 सिद्धांत योजना, विवेक, शिक्षा, बुद्धिमानी से खर्च, धैर्य, विनम्रता, सच्ची मित्रता, परिश्रम, सम्मान और दूसरों की गलतियों से सीखने पर जोर देते हैं ताकि जीवन सफल हो सके।

Web Title : Chanakya Niti: 10 Guiding Principles to Build Your World from Zero

Web Summary : Acharya Chanakya's timeless wisdom offers practical life lessons. His 10 principles emphasize planning, discretion, education, wise spending, patience, humility, true friendship, diligence, respect, and learning from others' mistakes for a successful life.