शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत अष्टमी व नवमीला आवर्जून म्हणावेत असे सप्तशतीतले सिद्धमंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:43 AM

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस, त्यात आज अष्टमी म्हणजे देवीची जन्मतिथी; त्यानिमित्ताने दिलेल्या श्लोकांचे सामूहिक पठण करून जागर करावा. 

नवरात्रीत भक्तीचा जागर करण्यासाठी आपण सगळेच सज्ज झालो आहोत. या प्रचंड नकारात्मक वातावरणात गरज आहे, सकारात्मकतेची पेरणी करण्याची. येत्या नऊ दिवसांत नऊ प्रकारच्या धान्याबरोबर नऊ सकारात्मक विचारांचीदेखील आपण रुजवण करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संकल्पला परिपूर्णता येण्यासाठी 'सप्तशती'मधील सिद्धमंत्रांचा नक्कीच उपयोग होईल. 

सामुहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे, यात जो फरक असतो, तोच सामुहिक जप-जाप्यात असतो. म्हणून तर, सहस्रावर्तन असो किंवा सहस्रजप, हे संकल्प सिद्धीस जावेत, म्हणून भाविक संघटित होऊन प्रार्थना करतात. आपणही नवरात्रीच्या निमित्ताने एकत्रितरित्या या सिद्धमंत्रांचा अवलंब करू आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या आदि शक्तीला हे वैश्विक संकट दूर करण्याची प्रार्थना करू. 

सप्तशती या प्रासादिक ग्रंथात ७०० मंत्ररूप श्लोक आहेत. या ग्रंथात श्रीमदभगवतीच्या कृपेचा महिमा वर्णन केला आहे. तसेच अनेक गूढ साधना रहस्यांचाही यात समावेश आहे, असे म्हणतात. या दिव्य ग्रंथाच्या निष्काम पारायणाने भक्त मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

मंत्रांचे उच्चार वातावरणनिर्मिती करतात. ज्याप्रमाणे संगीत सभेत तानपुरा, तबला, बासरी, हार्मोनिअम या वाद्यवादनाने सभेची पार्श्वभूमी तयार होते आणि त्यात गायकाच्या सुरेल रचनांची भर पडते, त्याप्रमाणे भगवन्नाम घेत असताना स्तोत्रपठण तसेच मंत्रोच्चारण यामुळे योग्य परिणाम साधला जातो. जीभेला चांगले वळण लागते. सकारात्मकता वाढते,म्हणून मंत्रांचे नित्यपठण करायचे असते. आपणही पुढील मंत्रांचे पठण करूया.

इत्थं यदा यदा बाधा, दानवोत्था भविष्यति,तदा तदावतिर्यादं करिष्याम्यरिसंक्षयम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं शत्रुभ्यो न भयं तस्य,दस्थुतो वा न राजत:न शस्त्रानलतोयौधात्कदाचित्संभविष्यति।।

ऐं ऱ्हीम क्लीं दुर्वृत्तानामशेषाणां बलहानिकरं परम् रक्षोभूतशिाचानां पठनादेव नाशनम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं मम प्रभावास्हिंहाद्या दस्यवो वैरिणस्तथा,दूरादेव पलायन्ते स्मरनश्चरितं मम् ।।

दुर्गे देवि नमस्तुभ्यं सर्वकामार्थसाधिके,मम सिद्धीमसिद्ध वा स्वप्ने सर्व प्रदर्शय।।

या मंत्रजपांचे नित्यपारायण करावे.हे मंत्रोच्चार कठीण वाटत असले, तरी ते योग्य परिणाम साधतात. म्हणून कोणत्याही प्रकारे आळस न करता, येत्या नवरात्रीत रोज स्नान करून, शुचिर्भुत होऊन, आसनस्थ होऊन उपरोक्त मंत्रपठण करावे. देवीला आपली इप्सित मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी आणि केवळ आपलेच नाही, तर सर्वांचे भले कर, रक्षण कर आणि सर्वांना संकटमुक्त कर, असे मागणे मागावे. जगदंबsss  उदयोस्तु!

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३