शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

Chaitra Gauri 2024: पार्वती माता अन्नपूर्णा कशी झाली? वाचा गृहिणींचे महत्त्व अधोरेखित करणारी चैत्रगौरीची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:01 IST

Chaitra Gauri 2024: रिकाम्या पोटी मिळालेलं ज्ञान कामाचं नाही, त्यामुळे आपले पालन पोषण करणारी अन्नपूर्णा अर्थात चैत्रगौर तिची सुंदर गोष्ट आवर्जून वाचा. 

>> विनय  मधुकर जोशी (भारतीयविद्या अभ्यासक,नाशिक)

आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया.आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत  गौरीची  पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो.देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो.अनेक शुभ चिन्हांची रांगोळी" चैत्रांगण " काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी ही भौतिक समृद्धीची देवता.अन्नधान्य ,वात्सल्य ,धन संपती ,सौंदर्य ,मांगल्य ,कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा.आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान!.योग ,वैराग्य,ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते.बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.

पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ? शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे. विश्वातील सौंदर्य ,मांगल्य , नातीगोती ???ते हि असत्यबर मग आपण खातो ते अन्न तरी ?तेही खोट ,असत्य ,आभासीच ,फक्त ब्रह्म तत्वच सत्य !!

झालं ….गौरीला आला थोडा राग . ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना.या क्षणी मी अंतर्धान होते. गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले ,नात्यांचा गोडवा उडाला ,घराचे घरपण हरपले ,सात्विक सौंदर्य विरले,आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले.

 शिवाना वाटले हरकत नाही.या वाचून जगाचे  काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव ,मानव ,ऋषी ,पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं  ब्रह्म कसलं ज्ञान.आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. ओम भवति भिक्षां देही|आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ??महादेवानी पाहिलं ,आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे ,मांगल्य लेवून ,पावित्र्य पांघरून ,समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र ,वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय  परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती ,शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला.शिव म्हणाले  ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी ,त्यासाठी सकस अन्न हवे, अन्न हे पूर्णब्रह्म .त्याचीच  भिक्षा दे !!!ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले ,शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले.

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू  सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस ,जगाची आई बनून अन्न पुरवणारी  तू अन्नपूर्णा आहेस.साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.

ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील  द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको  सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती.परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे.कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात.तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं ,नाती जपावीत ,घराला घरपण द्याव.हे सगळं करत असताना "गृहिणी कुठे काय करते?" असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.

या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर.रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते.किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात.त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.

स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे. शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन!

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।

संपर्क : vinayjoshi23@gmail.com

टॅग्स :Navratriनवरात्री