>> सुमेध रानडे, ज्योतिष अभ्यासक
बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा मोठा प्रभाव असतो. बुध पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा बुध वक्री(Budha Vakri 2025) होतो, तेव्हा पृथ्वीचे तत्त्व असंतुलित होते, त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये – पूर, भूकंप, त्सुनामी, भूस्खलन, पूल कोसळणे, रेल्वे आणि रस्ते अपघात यात वाढ होण्याची शक्यता असते.
तसेच बुध हा मेंदू आणि भावना यांचे संचालन करतो, त्यामुळे मानसिक अस्थैर्यामुळे किंवा तणावामुळे काही चुका किंवा अतिरेकी कृती होऊ शकतात. मात्र भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. ग्रह हे फक्त घटनांची एक चौकट तयार करतात, त्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम आपल्या कृतीवर (योग्य की अयोग्य) अवलंबून असतो. नैसर्गिक आपत्ती सोडल्यास इतर बहुतेक घटना मानवी चुकांमुळे किंवा दुर्लक्षामुळेच घडतात, नाही का?
तरीदेखील या काळात आपल्याला कोणती काळजी घेता येईल?
आर्थिक बाबतीत:
>> ऑनलाईन फसवणुकीच्या शक्यता वाढतात, याकाळात कोणत्याही ऑफरवर सहज विश्वास ठेवू नका.>> आर्थिक अनिश्चितता वाढेल, नवीन गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय टाळा.
Astrology: सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश: सुट्टीवर गेलेला पाऊस परतणार, श्रावणधारा बरसणार!
नातेसंबंध:
>> गैरसमज आणि संवादात अडथळे येऊ शकतात, घरगुती वादग्रस्त चर्चा टाळाव्यात.>> नात्यांमध्ये मोठे निर्णय घेणे टाळा; अशा निर्णयांमध्ये चुका होण्याची शक्यता अधिक असते आणि नंतर त्यांच्यावर पुनर्विचार करावा लागू शकतो.
आरोग्य:
>> अन्न आणि पाण्यामुळे होणारे आजार होण्याची शक्यता वाढेल, बाहेरचे खाणे टाळा.>> त्वचेचे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, आवश्यक तेवढी स्वच्छता पाळा.>> ताप जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विलंब करू नका, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या.
इतरही शक्यता:
>> महत्त्वाची कागदपत्रे हरवण्याची शक्यता, ती व्यवस्थित ठेवावीत.>> सुरक्षा विषयक (शारीरिक आणि डिजिटल) घोटाळे वाढण्याची शक्यता आहे, अशावेळी पासवर्ड, चावी, कुलूप यांचा सांभाळून वापर करा.
अपघात टाळण्यासाठी :
>> ओल्या किंवा निसरड्या ठिकाणी घसरून अपघात होण्याची शक्यता, जलस्रोतांच्या आसपास विशेष काळजी घ्या.>> वाहन चालवताना अधिक सतर्क राहा.>> वाहनाबाबत जराही शंका असेल, तर तपासणी करा – सुरक्षितता महत्त्वाची आहे.
कोणत्या राशींवर अधिक परिणाम होऊ शकतो?
>> वक्री शनीमुळे मेष आणि धनू राशींवर सगळ्यात जास्त परिणाम >> त्याखालोखाल वृश्चिक, मिथुन, कन्या, कर्क, तुला आणि त्यानंतर इतर राशींवर
ज्यांची बुधप्रदत्त वैशिष्ट्ये आहेत – हुशार, वाक्पटू, विनोदी, मित्रांमध्ये लोकप्रिय, आर्थिक सल्लागार, बँक कर्मचारी, लेखक, प्रकाशक त्यांच्यावर मध्यम परिणाम होण्याची शक्यता आहे.
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
कोणती उपासना करावी?
>> बुध भगवान विष्णूचा अनुयायी आहे, म्हणून बुधवारी आणि रविवारी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ ठरेल.>> बुध पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो, ज्याचे वैशिष्ट्य 'सुगंध' आहे – त्यामुळे नैसर्गिक अत्तर किंवा सुगंधी तेल (प्राजक्त किंवा चंदन) लावा.>> रोज संध्याकाळी धूप किंवा नैसर्गिक कापूर जाळा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
संपर्क : ९५६१०९३७४०