Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 16:12 IST2025-12-16T16:09:56+5:302025-12-16T16:12:05+5:30
Budh Pradosh 2025: यंदा १७ डिसेंबर रोजी २०२५ या इंग्रजी वर्षातले शेवटचे बुध प्रदोष व्रत आहे, शिव कृपेने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी म्हणून दिलेली उपासना करा.

Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी (तेरस) तिथीला प्रदोष व्रत (Pradosh Vrat) पाळले जाते. प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. जेव्हा ही त्रयोदशी तिथी बुधवारी येते, तेव्हा त्याला बुध प्रदोष व्रत म्हणतात. १७ डिसेंबर २०२५ रोजी बुधवारी हा दुर्मिळ योग जुळून येत आहे, जो विशेषतः ज्ञान, बुद्धिमत्ता आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत फलदायी मानला जातो.
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण
प्रदोष व्रताचे महत्त्व :
प्रदोष म्हणजे 'रात्रीचा पहिला प्रहर' (संध्याकाळ आणि रात्रीचा मध्यकाळ). धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष काळात भगवान शिव कैलास पर्वतावर आनंदाने नृत्य करतात. या काळात त्यांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
शुभ मुहूर्त: १७ डिसेंबर २०२५ : बुध प्रदोष व्रतासाठी सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे प्रदोष काल (संध्याकाळची वेळ).
प्रदोष व्रताची तिथी: १७ डिसेंबर २०२५, बुधवार
पूजा करण्याची वेळ (प्रदोष काल): सायंकाळी ०५:३५ ते ०७:४५ पर्यंत (स्थानिक वेळेनुसार थोडा बदल होऊ शकतो).
बुध प्रदोष व्रताचे विशेष लाभ
बुधवार हा बुध ग्रहाशी (Mercury) संबंधित आहे, जो बुद्धी, वाणी, तर्क आणि शिक्षणाचे कारक आहेत. त्यामुळे बुध प्रदोष व्रतामुळे खालील विशेष लाभ मिळतात:
कर्जमुक्तीसाठी: ज्यांना खूप दिवसांपासून कर्जातून मुक्ती मिळत नाहीये, त्यांनी या दिवशी शंकराची पूजा केल्यास कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होतात.
बुद्धिमत्ता आणि ज्ञान: विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा दिवस उत्तम आहे. यामुळे स्मरणशक्ती (Memory) आणि एकाग्रता वाढते.
संतान प्राप्ती (अपत्यप्राप्ती): ज्या जोडप्यांना संतती हवी आहे, त्यांनी या दिवशी व्रत करून पूजा केल्यास संतान प्राप्तीचा योग मजबूत होतो.
शुभ वार्ता: या दिवशी केलेले कोणतेही महत्त्वाचे काम शुभ फल देते.
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
पूजा विधी आणि उपाय
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी खालील विधी पाळल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो:
स्नान: सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
पूजन: प्रदोष काळात (संध्याकाळी) शिव मंदिरात जावे किंवा घरीच शिवलिंगाची पूजा करावी.
अभिषेक: शिवलिंगावर जल, दूध, दही, तूप आणि मध यांचा अभिषेक करावा.
उपाय:गणपती बाप्पाची पूजा करणे बुध प्रदोष व्रतामध्ये विशेष महत्त्वाचे मानले जाते. 'ओम गं गणपतये नमः' चा जप करावा.
नैवेद्य: शंकराला बेलपत्र, धत्तूर, आणि शमीची पाने अर्पण करावीत.
या दिवशी व्रत पाळून भगवान शिवाची उपासना केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख-शांती नांदते.