शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

Bornhan: मकर संक्रांत ते रथसप्तमी: बाळाची पहिली संक्रांत? मग 'बोरन्हाण' घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:04 IST

Bornhan: यंदा १४ ते २५ जानेवारी अर्थात मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तान्ह्या बाळाचे तसेच ५ वर्षांखालील मुलांचे बोरन्हाण करता येणार आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती.

मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात घराघरात लहान मुलांचे 'बोरन्हाण(Bornhan 2026) घातले जाते. हा केवळ एक कौटुंबिक सोहळा नसून, तो मुलांवर केला जाणारा एक महत्त्वाचा शिशुसंस्कार आहे. निसर्गाशी आणि बदलत्या ऋतूंशी बाळाची नाळ जोडण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!

बोरन्हाण म्हणजे नक्की काय?

आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर बाह्य सृष्टीतील ऋतूमानाशी जुळवून घेण्याची ताकद बाळाला मिळावी, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असतो. हिवाळ्यातील आरोग्यदायी फळांचा 'अभिषेक' बाळावर घालून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.

बोरन्हाणची तयारी आणि सजावट

बोरन्हाण घालताना बाळाचा साज विशेष असतो:

पोशाख: थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून बाळाला काळ्या रंगाचे कपडे (झबले, सदरा किंवा परकर-पोलके) घातले जातात. शास्त्रानुसार काळा रंग उष्णता शोषून घेतो.

दागिने: काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे पांढऱ्या शुभ्र हलव्याचे दागिने बाळाला घातले जातात. मुलांना मुकुट, बासरी, हार तर मुलींना नथ, कंबरपट्टा, बांगड्या अशा दागिन्यांनी सजवले जाते.

मकर संक्रांती २०२६: सुगड पूजनाशिवाय संक्रांत अपूर्ण! वाचा साहित्य, शास्त्रोक्त विधी आणि शुभ मुहूर्त

बोरन्हाणचा विधी: कसा करावा 'खाऊचा वर्षाव'?

बाळाला पाटावर बसवून त्याचे औक्षण केले जाते. त्यानंतर बाळाच्या डोक्यावरून खालील गोष्टींचे मिश्रण हळूवारपणे ओतले जाते (ज्यामुळे बाळाला लागणार नाही) १. आरोग्यदायी गोष्टी: बोरं, ऊसाचे कापे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे आणि लाह्या. २. मुलांच्या आवडीच्या गोष्टी: हलव्याचे दाणे, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स आणि बिस्किटे.

हा सर्व खाऊ गोळा करण्यासाठी आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावले जाते. मुलांची ही झुंबड आणि खाऊ वेचताना होणारा आनंद सोहळ्याची रंगत वाढवतो.

Makar Sankranti 2026: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?

सामाजिक महत्त्व

या निमित्ताने लेकुरवाळ्या स्त्रियांना बोलावून त्यांचे हळद-कुंकू केले जाते. एकमेकींच्या भेटीगाठी, गप्पा आणि गाण्यांमुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. मुलांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी निर्माण होण्यासाठी हा पाया असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bornhan: Celebrating a baby's first Makar Sankranti with tradition.

Web Summary : Bornhan, a ceremony from Makar Sankranti to Rathsaptami, introduces babies to nature. The baby is adorned and showered with treats and sweets, fostering a connection to culture and health. Women are invited for Haldi-Kunku, enhancing the festive atmosphere.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणkidsलहान मुलं