Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:48 IST2025-10-22T12:46:42+5:302025-10-22T13:48:01+5:30
Bhaubeej 2025 Wishes in Marathi: २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, हे मराठी शुभेच्छा संदेश पाठवून या सणाचा गोडवा वाढवा.

Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
Bhai Dooj 2025 Wishes in Marathi: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' असं हे बहीण भावाचं गोड नातं, ज्यात प्रेम असतं पण व्यक्त केलं जात नाही तर ते आपोआप होत जातं. या नात्याचा गोडवा वाढवणारे दोन सण म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊ बीज(Bhai Dooj 2025). २३ ऑक्टोबर रोजी दिवाळीतला हा शेवटचा पण महत्त्वाचा सण शुभेच्छांनी आणखी गोड करूया. हे सुंदर मराठी संदेश पाठवून, सोशल मीडियावर स्टेट्स ठेवून आपल्या भावा बहिणीला गोड शुभेच्छा द्या.
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
- बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात…
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
- सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया!
भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!
- जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज हार्दिक शुभेच्छा!
- आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया
राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
- रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे भाऊबीजेचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
- दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
- तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
कार्तिक मासात का आणि कसे केले जाते दामोदर व्रत, काय होतात लाभ? जाणून घ्या!