Bhagat Singh Koshyari At Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत भूमिका मांडत केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना, हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करतो, असे भगतसिंह कोश्यारी यांनी नमूद केले. पद्मभूषण पुरस्कार जाहीर होताच भगतसिंह कोश्यारी यांनी अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतले.
पत्रकारांशी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले की, अयोध्येत नवे राम मंदिर बनण्याच्या आधी अनेकदा येथे आलो होतो. परंतु, नवीन भव्य राम मंदिर बांधल्यानंतर इथे येण्याचा योग जुळून आलेला नव्हता. एका कार्यक्रमानिमित्त या भागात आलो होतो. त्यामुळे राम मंदिरात येऊन रामललाचे दर्शन घेतले. प्रभू श्रीरामांची ही लीला आहे. संपूर्ण जगभरातील हिंदूंचे हे परम स्थान आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत श्रीराम कायम आपल्यासोबत असतात, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
सगळी जनता PM मोदींच्या पाठिशी ठामपणे उभी
पुढे बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल सोडल्यानंतर राजकारण करणार नसल्याचे निश्चित केले होते. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर टिकाव धरेल, असे नेतृत्व देशात नाही. केरळमध्येही पंतप्रधान मोदी जिंकत आहेत. संपूर्ण देशातील जनता पंतप्रधान मोदी आणि प्रभू श्रीराम यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे यावरून असल्याचे स्पष्ट होते, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबाबत भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले. मला विश्वास आहे की आता आमचे संघ कार्यकर्ते समाजासाठी आणखी निस्वार्थपणे काम करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्याच्या स्वयंसेवकांना हा पुरस्कार समर्पित करत आहे. आज मी जे काही आहे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ स्वयंसेवकांच्या प्रेमामुळेच आहे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.
Web Summary : Bhagat Singh Koshyari dedicated his Padma Bhushan to the RSS, visiting Ayodhya's Ram Temple. He affirmed unwavering public support for PM Modi, even predicting victory in Kerala, crediting both Modi and Lord Rama.
Web Summary : भगत सिंह कोश्यारी ने पद्म भूषण आरएसएस को समर्पित किया, अयोध्या के राम मंदिर गए। उन्होंने पीएम मोदी के लिए अटूट सार्वजनिक समर्थन की पुष्टि की, यहां तक कि केरल में जीत की भविष्यवाणी करते हुए, मोदी और भगवान राम दोनों को श्रेय दिया।