Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:37 IST2025-05-21T11:35:34+5:302025-05-21T11:37:15+5:30

Astrology: ज्योतिष शास्त्रानुसार जून महिन्यात एखादा व्हायरस कोरोनाजन्य स्थिती निर्माण करणार असे भाकीत वर्तवले जाते आहे, त्याचा परिणाम कुठे असेल ते पाहू. 

Astrology: The transit of Rahu and Ketu will give the world a new virus, what will be the situation in India? | Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?

Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?

कोरोनाच्या आठवणींनीही अंगावर काटा येतो, अशातच तो परत येणार हा विचार सुद्धा आपली झोप उडवेल हे नक्की! मात्र ग्रहस्थिती पाहता येत्या काळात अर्थात जून मध्ये कोरोनासदृश्य एखादा व्हायरस पुन्हा एकदा जगभर धुमाकूळ घालणार असल्याचे भाकीत ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवले आहे. त्याचा भारतात किती प्रभाव असेल? महामारी होईल का? लोकांच्या कामावर, नोकरीवर गदा येणार का? याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. 

डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरातून कोरोना पसरला आणि काही महिन्यांतच त्याने जगातील अनेक देशांना वेढले आणि मार्च २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने त्याला जागतिक साथीचा रोग घोषित केला. तीन वर्षं त्याचा प्रभाव टिकला. याचा परिणाम ७० लाखांहून अधिक लोकांना झाला आणि त्यातच अनेकांनी त्यांचे प्रियजन गमावले. 

व्हायरसचा पुन्हा धोका?

गेल्या आठवड्यात, चीनजवळील सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाने डोकं वर काढल्याच्या बातम्या आल्या. रुग्णांची वाढती संख्या चिंतेचे कारण बनली आहे. फक्त ५९ लाख लोकसंख्या असलेल्या सिंगापूरमध्ये २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान कोरोनाव्हायरसने ग्रस्त १४,००० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे प्रशासन चिंतेत आहे. भारतातील अहवालांनुसार, १९ मे पर्यंत फक्त २५७ कोरोना व्हायरस प्रकरण आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगायचे, तर जेव्हा मोठे ग्रह राहू आणि केतूच्या नक्षत्रात येतात किंवा जेव्हा मोठ्या संख्येने ग्रह राहू-केतूच्या युतीत असतात तेव्हा विषाणूंशी संबंधित आजार पसरतात आणि लोकांना प्रभावित करतात.

कोरोना आधीसारखाच ठरणार त्रासदायक?

२६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी, शनि आणि गुरु हे मोठे ग्रह धनु राशीत केतूसह इतर ग्रह सूर्य, बुध आणि चंद्र यांच्यासह एकत्रित झाले होते. त्यावेळी केतुचे नक्षत्र मूळ स्थितीत होते. त्या सूर्य ग्रहणात कोरोना विषाणू वेगाने पसरला आणि जागतिक साथीचा रोग बनला. जर आपण सध्याच्या संक्रमण परिस्थितीकडे पाहिले तर, २९ मार्चपासून मीन राशीत शनीचे संक्रमण सुरू झाले. शनीने जल तत्व मीन राशीत संक्रमण केले आणि राहूशी युती केली आणि यासोबत, एप्रिल-मे मध्ये समुद्राजवळ असलेल्या आग्नेय आशियातील सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. विषाणू किंवा सूक्ष्मजंतूंसाठी जबाबदार असलेल्या राहू ग्रहाशी शनीची जल राशीत भेट झाल्यामुळे कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ झाली, परंतु राहू आता मीन राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा मोठा धोका दिसत नाही. राहूच्या कुंभ राशीत प्रवेशामुळे, पुढील महिन्याच्या सुरुवातीला सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होऊ शकतात. ६ जून रोजी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल, त्यामुळे मंगळ केतुसोबत युती करेल, ज्यामुळे काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. कोरोना विषाणूचे रुग्ण वाढतील पण परिस्थिती नियंत्रणात राहील आणि रुग्ण दगावण्याच्या स्थितीपर्यंत ही रोगराई पसरेल असे वाटत नाही, असा अंदाज ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही तरी आवश्यक काळजी घ्यायलाच हवी!

Web Title: Astrology: The transit of Rahu and Ketu will give the world a new virus, what will be the situation in India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.